शिर्सूफळ: सध्या ऊस तोडणी सुरू आहे. यामुळे शेतकरी खोडवा ठेवण्याच्या तयारीत आहेत. पारवडी ता. बारामती येथे कृषि विभागाच्या वतीने कृषि अधिकारी वैभव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील शेतकरी करण तानाजी गावडे यांच्या प्रक्षेत्रावर लक्ष्य एकरी शंभर टन ऊस उत्पादन व खोडवा पाचट व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी किसन काझडे कृषि अधिकारी उंडवडी सुपे यांनी पाचट कुजविण्याचे फायदे तसेच खर्चात बचत करून उत्पन्नवाढीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील जैविक घटकांचा व अन्नद्रव्यांचा नाश होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो.
ऊसाच्या पाचटात 0.50 टक्के नत्र, 0.20 टक्के स्फुरद, 1 टक्के पालाश आणि 40 टक्के सेंद्रिय कर्ब असतो असे त्यांनी सांगितले. अनंत घोळवे कृषि पर्यवेक्षक यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, कांदाचाळ, ठिबकसिंचन, रब्बी पीक विमा, महात्मा गांधी रोजगार हमी फळबाग लागवड, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादी योजनांची माहिती दिली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा जिल्हा प्रशिक्षण अभ्यास वर्ग संपन्न
उद्धव चौधर कृषि सहाय्यक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून उपस्थित शेतकऱ-यांना प्रत्यक्ष प्लॉटवर बुडके छाटणे, पाचट योग्य पद्धतीने पसरविणे, रासायनीक खते व जिवाणू खते देण्याची पद्धत याबाबत प्रात्याक्षिकाद्वारे शेतक-यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंना सेबीचा दणका, सभासदांना 41 कोटी परत देण्याचे आदेश
यावेळी उपस्थित शेतक-यांना शेतीशाळा किट, कृषि निविष्ठांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी बचत गटाचे सदस्य नवनाथ आटोळे, उत्तम गावडे, कृष्णा शिंदे, राजेंद्र कोकणे, भिमराव गार्डी, सुहास गार्डी, दादासो गावडे शेतकरी आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या;
पुन्हा शेतकरी मैदानात! देशातील 550 जिल्ह्यांतील शेतकरी दिल्लीत 'गर्जना रॅली' काढून गर्जना करणार
साखर करारात मोडतोड, निर्यातदारांनी कारखान्यांकडे केले दुर्लक्ष
शेतकऱ्यांनो १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवा, त्यानंतर होतोय खोडकिडीचा प्रादुर्भाव
Share your comments