Sugarcane Farming: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून नगदी पिकांची (Cash crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जात आहे. मित्रांनो ऊस (Sugarcane Crop) हे देखील एक नगदी पीक आहे. या पिकाची शेती संपूर्ण भारतवर्षात केली जाते. आपल्या राज्यात देखील या पिकाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात जवळपास सर्वत्र उसाची शेती केली जाते.
विशेष म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी (Sugarcane Grower Farmer) उसाच्या शेतीतून चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) देखील करत आहेत. मात्र असे असले तरी जाणकार लोक शेतकरी बांधवांना (Farmer) उसाच्या सुधारित जातींची (Sugarcane Variety) लागवड करण्याचा सल्ला देतात.
अशा परिस्थितीत आज आपण उसाच्या काही प्रगत जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो आज आपण उसाच्या काही प्रगत जाती जाणून घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी लाखो रुपयांची कमाई करू शकणार आहेत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
उसाच्या काही सुधारित जाती
Co.Se 13235:- मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हि जात उसाची एक सुधारित जात म्हणून ओळखली जाते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, CO 13235 ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते. कारण इतर उसाच्या तुलनेत या जातीचा ऊस लवकर पक्व होणार आहे. यामुळे कमी कालावधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन मिळणार आहे.
त्याचे उत्पादन हेक्टरी 81 ते 92 टन आहे. त्याच्या व्यावसायिक साखरेबद्दल बोलायचे तर त्यात 11.55 आढळल आहेत. या जातींचे उसाचे पीक 10 महिन्यांत तयार होत असल्याचा दावा केला जातो. निश्चितच ऊस उत्पादक शेतकर्यांना दहा महिन्यात या जातीच्या पिकातून चांगली कमाई होणार आहे.
co.se 10239:- मित्रांनो ही देखील एक उसाची सुधारित जात असून या जातीची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. उसाचे हे वाण मध्यम उशीरा पक्व होणारे आहे. पाणी साचण्याच्या बाबतीत, त्याचे उत्पादन 63 ते 79 टन प्रति हेक्टर असते. नापीक किंवा पडीक जमिनीवर त्याचे उत्पादन 61 ते 70 टन असल्याचे आढळून आले आहे.
एवढेच नव्हे तर विशेष म्हणजे या जातींमध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव शून्य आहे. निश्चितच ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. या जातीच्या उसाची शेती शेतकरी बांधवांना लाखो रुपयांची कमाई करून देणार आहे.
Share your comments