कपाशी पिकांमधील अनेक प्रकारच्या कार्यविधि वाढवण्यासाठी व पिकास उत्तेजक प्रेरक म्हणून स्टीमुलंटचा वापर करतात. याचा वापर केल्याने कपाशी पिकामध्ये फुल,पाते तसेच फुलांच्या संख्येत भरघोस वाढ होते.
तसेच कपाशीच्या झाडाची वाढ देखील सर्वांगीण पद्धतीने होते व बोंडाचा आकार देखील वाढतो. पानांचा आकार वाढतो त्यासोबत झाडाची भूक वाढते व या सर्व गोष्टींचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने होतो. अगदी कमीत कमी खर्चामध्ये मोठा फायदा मिळतो. तसे पाहायला गेले तर बाजारात बऱ्याच प्रकारचे स्टीमुलंट उपलब्ध आहेत. परंतु एखाद्या तज्ञाने किंवा विश्वासपात्र व्यक्तीने शिफारस केलेलेच वापरावे.
कपाशी पिकामध्ये स्टीमुलेंटचा वापर
स्टीमुलेंटचा वापर करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा, अन्नद्रव्य असावीत याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जमिनीमध्ये ओलावा जर कमी असेल किंवा खतांचा वापर मोजकाच असेल तर स्टीमुलेंट चा वापर टाळावा. कपाशीसाठी उडान, भरारी किंवा फ्लाइट आणि एलीग्झर यापैकी एक स्टीमुलेंट कपाशीला पाते लागलेले असतील तेव्हा फवारावे व त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी घेतल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ होते
तसेच सोयाबीन, तुर आणि हरभरा पीक फुलोरा अवस्थेत जेव्हा असते तेव्हा वरील स्टीमुलेंट चा वापर फायदेशीर ठरतो. बायोस्टीमुलेंटचे वेगळे प्रकार व कार्य तसेच प्रमाण आहे. बरेच शेतकरी फवारणी केल्यानंतर पीक हिरवे झाले म्हणजे समाधान होते व वापरले ते फार चांगले असे वाटते. ही महागडी उत्पादने फक्त हिरवेपणा वाढवण्यासाठी वापरून फायदा नाही तर असे बायोस्टीमुलंट वापरावे. याच्या वापराने हिरवेपणा वाढतोच परंतु पाती आणि फुलांची संख्या देखील भरघोस प्रमाणात वाढते. एवढेच नाही तर पाने आणि बोंडांचा आकार वाढून पिकांची सर्वांगीण वाढ होते. परंतु त्यांचे प्रमाण देखील माहीत असते तेवढेच गरजेचे आहे. काही बायोस्टीमुलंट दहा लिटर पाण्यासाठी फक्त अडीच मिली किंवा काही दहा लिटर पाण्यासाठी सात ते दहा मिली वापरण्याची शिफारस आहे.
( टीप-बायोस्टीमुलेंट समजून-उमजून व खात्री असलेल्या दुकानावरून तज्ञांचा सल्ला घेऊनच खरेदी करावे. उच्च गुणवत्तेचे स्टीमुलेंट वापरल्यास केलेल्या खर्चाचा पूर्ण फायदा मिळतो.)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:खूपच महत्वाचे! फळे व भाजीपाला जास्त काळ टिकवायचे असेल करा या पद्धतीचा अवलंब, होईल फायदा
Share your comments