1. कृषीपीडिया

Teakwood Farming: एका एकरात सागाचे 400 झाडे लावा आणि कमवा एक कोटी रुपये; कसं ते जाणून घ्या इथं

देशात काळाच्या ओघात शेती क्षेत्रात मोठा अमुलाग्र बदल बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधव पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी बांधव आता मागणी मध्ये असलेल्या नगदी पिकांची लागवड करण्याकडे जास्त लक्ष देत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना अल्प कालावधीत अधिक नफा देखील मिळत आहे. असे अनेक झाडे आहेत ज्याची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न पदरात घेऊ शकता. या झाडांपैकी एक आहे साग याची लागवड करून शेतकरी बांधव अल्पकालावधीत करोडपती बनू शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Teak Farming

Teak Farming

देशात काळाच्या ओघात शेती क्षेत्रात मोठा अमुलाग्र बदल बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधव पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी बांधव आता मागणी मध्ये असलेल्या नगदी पिकांची लागवड करण्याकडे जास्त लक्ष देत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना अल्प कालावधीत अधिक नफा देखील मिळत आहे. असे अनेक झाडे आहेत ज्याची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न पदरात घेऊ शकता. या झाडांपैकी एक आहे साग याची लागवड करून शेतकरी बांधव अल्पकालावधीत करोडपती बनू शकता.

सागाचे लाकूड बारामाही मागणीमध्ये असल्याने आणि याला मिळत असलेला बाजार भाव अधिक असल्याने साग लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते. बाजारात या लाकडाची मागणी अधिक आहे आणि त्या मानाने या लाकडाचा पुरवठा खूप नगण्य आहे. हेच कारण आहे की या लाकडाची किंमत इतर लाकुडपेक्षा अधिक असते, त्यामुळे याची लागवड शेतकऱ्यांना विशेष फायद्याची ठरू शकते असा अंदाज आहे.

सागाचा उपयोग तरी काय - सांगवान अर्थात साग झाडाचे लाकूड घरांच्या खिडक्या, जहाजे, बोटी, दरवाजे इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. हे लाकूड फर्निचर मध्ये वापरण्याचे कारण म्हणजे या लाकडाला उधई खात नाही. त्यामुळे सांगवान लाकडापासून बनवलेले फर्निचर अनेक वर्षे खराब होत नाही, आणि म्हणूनच त्याची मागणी कायम असते.

कुठं करता येते लागवड - भारतात साग लागवड कुठेही केली जाऊ शकते, भारतातील हवामान साग लागवडीसाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही तर वर्षभरात कोणत्याही महिन्यात याची लागवड करता येणे शक्य आहे. ज्या मातीचे pH मूल्य 6.50 ते 7.50 या दरम्यान असते त्यात जमिनीत या झाडाची लागवड केल्यास झाडाची वाढ चांगली होते आणि परिणामी उत्पादन चांगले मिळते. अशा सुपीक जमिनीत सांगवानची लागवड केली तर सागाची झाडे चांगली आणि लवकर वाढतात.

किती वर्षानंतर कमाई होणार - सागवान लागवड केल्यानंतर लगेच नफा प्राप्त होऊ शकत नाही, म्हणजे सागाचे झाड पूर्ण विकसित होण्यासाठी थोडा कालावधी लागतो. साग पासून लाकूड प्राप्त करण्यासाठी सुमारे 12 वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे याची लागवड केल्यानंतर आपणास ताबडतोब नफा मिळणार नाही मात्र बारा वर्षानंतर बारा वर्षांची कसर भरून निघेल एवढ नक्की.

साग लागवडीतून या पद्धतीने मिळणार एक कोटी रुपये - शेतकरी मित्रांनो जर आपणास साग लागवड करायची असेल तर, एक एकर क्षेत्रासाठी चारशे रोपांची आवश्‍यकता भासणार आहे. यासाठी आपणास 45 हजार रुपये खर्च अपेक्षित असतो. साग लागवड केल्यानंतर बारा वर्षांनंतर या चारशे झाडापासून एक कोटी रुपये सहज कमविले जाऊ शकतात. एका सागाच्या झाडापासून सुमारे 40 हजार रुपयांचे लाकूड प्राप्त होते, त्यानुसार 400 झाडांचे एक कोटी वीस लाख रुपये तयार होतात असा अंदाज आहे.

English Summary: start teakwood farming and earn 1 crore in 12 years learn more about it Published on: 06 March 2022, 11:29 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters