भारत हा शेतीप्रधान देश आहे, शेती हा एक बारामाही चालणारा व्यवसाय आहे. या व्यवसायात कालानुरूप बदल घडविणे आवश्यक आहे. तदनुसार शेतकरी बांधव शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत, शेतकरी बांधवांनी आता पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत नवीन औषधीय व नगदी पिकांची शेती करायला सुरुवात केली आहे. यातून अनेक शेतकरी बांधव लाखो रुपयांची कमाई देखील करत आहेत. कृषी जागरण देखील आपल्या शेतकरी मित्रांसाठी अशाच नवनवीन पिकांची माहिती घेऊन येत असते. आज आपण मशरूम फार्मिंग विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. मशरूम लागवड करून अनेक शेतकरी बांधव चांगला नफा कमवीत आहेत.
मित्रांनो मशरूम शेतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे मशरूम शेती अगदी कमी इन्वेस्टमेंट मध्ये सुरू करता येऊ शकते आणि यापासून मिळणारे उत्पन्न हे हजारो रुपयात असते. याची शेती करण्यासाठी आपणास जास्त साधनाची आवश्यकता देखील भासत नाही. शेतकरी बांधवांनो जसं की आपणास ठाऊक असेल अलीकडे मशरूम फार्मिंगला मोठा डिमांड आला आहे आणि सरकार देखील यासाठी शेतकरी बांधवांना प्रोत्साहित करीत आहे. मशरूमला दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे त्यामुळे मशरूम फार्मिंग शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचा सौदा साबित होणार आहे. शेतकरी मित्रांनो मशरूम फार्मिंगचे अजून एक वैशिष्ट्य असे की याची शेती आपण गच्चीवर देखील सुरू करू शकता किंवा एखाद्या खोलीत देखील यांची शेती केली जाऊ शकते. मशरूम ची शेती करून आपण दरमहा चांगली मोठी कमाई करू शकता.
मशरूम फार्मिंग साठी लागणारी जागा
मशरूम ची शेती करण्यासाठी आपणास 30 ते 40 यार्ड जमिनीवर निर्माण केल्या गेलेल्या एका खोलीची आवश्यकता भासेल. या खोलीमध्ये आपणास कंपोस्ट अर्थात मशरूम उगवण्यासाठी लागणारी माती आणि बीयाण्याचे मिश्रण ठेवावे लागेल. एकंदरीत मशरूम शेती खूपच कमी जागेत केली जाऊ शकते. मशरूम शेती साठी लागणारे कंपोस्ट आपणास बाजारातसहज उपलब्ध होऊन जाईल. शेतकरी मित्रांनो हे कंपोस्ट सावलीच्या जागी ठेवावे लागते. यानंतर 20 ते 25 दिवसात मशरूम उगायला सुरुवात होते.
शेतकरी मित्रांनो जर आपणासही मशरूम ची शेती करायची असेल तर आपण आधी यासाठी ट्रेनिंग घेणे अत्यावश्यक ठरते. जर आपण ट्रेनिंग घेऊन शेतीला सुरुवात केली तर आपणास चांगले उत्पन्न मिळू शकते. मशरूम ची किंमत बाजारात शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो दरम्यान असते. मशरूमची शेती आपण कमी इन्वेस्टमेंट करू शकता आणि यातून मोठी कमाई करू शकता. आपण मशरूमची पॅकिंग करून सहजरित्या बाजारात विक्री करू शकता.
Share your comments