देशात सध्या अनेक शेतकरी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देऊन औषधी वनस्पतींची लागवड करताना दिसत आहेत. औषधी वनस्पतीची लागवड ही इतर पिकांपेक्षा कमी खर्चिक असते तसेच लागवड करणे हे तुलनेने खूपच सोपे असते. म्हणून आता बहुतेक शेतकरी औषधी पिकांची लागवड करताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका औषधी वनस्पतीची लागवडिची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या पिकाचे आर्थिक गणित देखील समजून घेणार आहोत. आपण या वनस्पतीची लागवड अवघ्या वीस हजार रुपयात करू शकता आणि यातून चांगली मोठी कमाई करू शकता. आम्ही ज्या वनस्पती विषयी बोलत आहोत ती वनस्पती आहे लेमनग्रास. आपण लेमन ग्रासची शेती (Lemon grass farming) करून आपल्या उत्पन्नात अधिक भर पाडू शकता. चला तर मग शेतकरी मित्रांनोवेळ न दवडता जाणून घेऊया लेमनग्रास शेती विषयी.
याच्या तेलाची मार्केट मध्ये असते कायम मागणी
जर आपणासही लेमन ग्रासची शेती करायची असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लेमन ग्रासची लागवड विशेषता त्याच्या तेलासाठी केली जाते. लेमनग्रास पासून मिळणारे तेल चांगल्या किमतीत बाजारात विक्री केली जाते. या तेलाची बारामाही डिमांड असल्याने लेमन ग्रासची शेती शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते शेतकरी मित्रांनो लेमन ग्रास पासून मिळणारे तेल विशेषता कॉस्मेटिक उद्योगात (In the cosmetic Industry) वापरले जाते, याव्यतिरिक्त हे तेल अनेक औषधे बनवणार्या कंपन्या देखील उपयोगात आणतात. त्यामुळे लेमन ग्रासच्या तेलाला नेहमीच मोठी मागणी असते. म्हणून लेमन ग्रास शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा ठरत आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लेमन ग्रास शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड ही कोरडवाहू क्षेत्रात (In the arid region) देखील केली जाऊ शकते. जर आपण एक हेक्टर क्षेत्रात लेमन ग्रास लागवड केली तर आपणास वर्षभरात सुमारे चार लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.
केव्हा केली जाते लेमनग्रास लागवड
कृषी वैज्ञानिकांच्या मते लेमन ग्रासची लागवड फेब्रुवारी महिन्यात केल्यास त्यापासून मिळणारे उत्पादन हे खुप दर्जेदार असते. लेमन ग्रास शेतीची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास आपणास कमीत कमी सहा वर्षे या पासून उत्पादन मिळत राहते. शेतकरी बांधवांनो जर आपणास एक हेक्टर क्षेत्रात लेमनग्रासची लागवड करायची असेल तर सुरुवातीला आपणास जवळपास 20 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.
मेंथाच्या लागवडी प्रमाणेच लेमन ग्रास ची लागवड केली जाते. एक हेक्टर क्षेत्रातून लेमन ग्रास या शेतीतून 325 लिटर पर्यंत लेमन ग्रासचे तेल (Lemongrass oil) प्राप्त होऊ शकते. लेमन ग्रास ची वर्षातून तीन ते चार वेळा काढणी केली जाते. लेमन ग्रासची प्रति लिटर तेलाची किंमत पंधराशे रुपये पर्यंत असते. तेलाव्यतिरिक्त लेमन ग्रासचे पानेदेखील विक्री केले जातात.
Share your comments