1. कृषीपीडिया

"या" पद्धतीने जिरे लागवड करून आपणही कमवू शकता बक्कळ पैसा, जाणुन घ्या याविषयी

अलीकडे देशात पारंपरिक पिकपद्धतीत बदल होतांना दिसत आहेत. आता शेतकरी बांधव नगदी पिकांची लागवड करताना मोठ्या प्रमाणात नजरेला पडत आहेत, अनेक शेतकरी बांधव फळबागांची लागवड करत आहेत तर काही शेतकरी मार्केटमध्ये डिमांडमध्ये असलेल्या पिकांची लागवड करून चांगली मोठी कमाई करत आहेत. आज आपण अशाच एका पिकाविषयी जाणून घेणार आहोत ज्याची नेहमीच बाजारात मागणी बनलेली असते. त्यामुळे या पिकाची लागवड करून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करू शकता. आज आपण जिरे लागवडविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय स्वयंपाक घरात कॉमन पदार्थ म्हणून जिऱ्याला ओळखले जाते. जिरे पदार्थाची चव तर वाढवतेच शिवाय यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे मानवी शरीराला अनेक आश्चर्यकारक लाभ होतात. त्यामुळे जिल्ह्याची बारामाही मागणी बाजारात बघायला मिळते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया जिरे लागवडी विषयी सविस्तर माहिती.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image courtesy-the homesteadgarden

कशी करणार जिरे लागवड

जिरे लागवडीसाठी शेत जमीन निवडताना विशेष काळजी घ्यावी लागते, जिरे लागवड प्रामुख्याने अशा जमिनीत करावे ज्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत असतो. चिकन माती असलेली सुपीक जमीन तसेच वाळूमिश्रित चिकन माती असलेली जमीन जिरे लागवडीसाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी जिरे लागवडीसाठी पूर्वमशागत करणे फार महत्त्वाचे ठरते जर पूर्वमशागत व्यवस्थितरित्या केली गेली तर जिरे लागवडीतून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. पूर्वमशागतती मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती नांगरणीची, जिरे लागवड करण्यापूर्वी जमीन व्यवस्थित रित्या दोन-तीन वेळेस नांगरून घ्यावी. जेणे करून जमीन चांगली भुसभुशीत होईल. जमीन नांगरल्यानंतर मागील हंगामातील पिकांचे अवशेष संपूर्ण रित्या वेचून घ्यावे आणि शेत चांगले सपाट करून घ्यावे.

जिरे पिकाच्या प्रमुख सुधारित जाती

तसं बघायला गेलं तर जिरे पिकाच्या अनेक सुधारित जाती बाजारात उपलब्ध आहेत मात्र या जातींपैकी तीन जाती सर्वात जास्त लागवड केल्या जातात. तसेच या जातीतून दर्जेदार उत्पादन देखील प्राप्त केले जाऊ शकते. जिरे पिकाच्या RZ19 and 209, RZ223 and GC 1-2-3 या सुधारित जातींची लागवडमुख्यतः शेतकरी बांधव करत असतात. आणि यातून चांगले दर्जेदार उत्पादन देखील मिळवत असतात. या जातीपासून जवळपास 125 दिवसात उत्पादन मिळायला सुरुवात होते. या जातीपासून एकरी 200 किलोग्राम जिरे उत्पादन प्राप्त होते. त्यामुळे कृषी क्षेत्रातील अनेक जाणकार लोक याच जातींची लागवड करण्याचा सल्ला देताना दिसतात.

किती मिळणार उत्पन्न

जिरे पिकाची जर सुधारित जातींची लागवड केली तर त्यापासून हेक्‍टरी आठ क्विंटल एवढे दर्जेदार उत्पादन प्राप्त होते. जिरे लागवडीसाठी हेक्‍टरी 40 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. जिऱ्याला शंभर रुपये किलो असा बाजार भाव जवळपास मिळत असतो याप्रकारे जर आपण एक हेक्‍टर क्षेत्राचा जर किशोर केला तर आपणास यातून 45 हजार रुपये निव्वळ नफा राहू शकतो. एकंदरीत पाच एकर क्षेत्रातून दोन लाख रुपयांची कमाई जिरे लागवडीतून केली जाऊ शकते.

English Summary: start cumin seed farming and earn more profit Published on: 05 January 2022, 09:01 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters