भारतात फ्लॉवर एक मुख्य भाजीपाला पीक म्हणून ओळखले जाते अनेक शेतकरी फ्लॉवरची लागवड करून चांगली मोठी कमाई करत असतात फ्लावर ची मागणी बारामाही भारतीय बाजारपेठेत बघायला मिळते त्यामुळे याची शेती शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. फ्लावरची जर सुधारित पद्धतीने लागवड केली गेली तर यातून चांगला मोठा नफा प्राप्त केला जाऊ शकतो. म्हणून आज कृषी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी फ्लावर लागवडीविषयी महत्त्वपूर्ण बाबी घेऊन हजर झाले आहे. चला तर मग शेतकरी मित्रांनो फ्लावर लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान जाणून घेऊया.
फ्लावर लागवडीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे फ्लॉवरची लागवड जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत सहज रित्या केली जाऊ शकते. भारतीय हवामान फ्लॉवर लागवडीसाठी खूपच अनुकूल असल्याचे सांगितले जाते. राज्यातील हवामान देखील फ्लावरच्या लागवडीसाठी चांगले असल्याचे कृषी वैज्ञानिक नमूद करतात. फ्लॉवरची लागवड जरी कुठल्याही प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकत असेल, तरी याची लागवड मुख्यतः वाळूमिश्रित जमिनीत करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात. फ्लॉवरची लागवड मुख्यता सहा ते सात पीएच असलेल्या जमिनीत केल्यास यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. फ्लावर लागवडीत तापमानाचे विशेष महत्त्व वैज्ञानिक नमूद करतात. फ्लावर च्या वाढीच्या वेळेस तापमान हे 23 डिग्री सेल्सिअस दरम्यान असावे त्यानंतर तापमान हे 17 ते 20 डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्यास त्यापासून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते.
फ्लॉवरची लागवड समशीतोष्ण प्रदेशात केले जाते फ्लॉवरची लागवड गरम हवामानात देखील केली जाते मात्र तापमान हे 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जाता कामा नये तसेच थंड प्रदेशात देखील फ्लॉवरची लागवड बघायला मिळते मात्र थंड प्रदेशात तापमान हे 15 ते 20 डिग्री सेल्सिअस दरम्यान असावे. एकंदरीत बर्फाळ प्रदेशात फ्लॉवरची लागवड केली जाऊ शकत नाही. फ्लावरच्या लागवडीत पूर्वमशागत देखील एक महत्त्वाचा रोल प्ले करत असते फ्लावर लागवड करण्याआधी जमिनीची पूर्वमशागत योग्यरीत्या करणे आवश्यक ठरते लागवडीसाठी जमीन तयार करताना सर्वात आधी चांगल्या पद्धतीने शेत नांगरणे आवश्यक ठरते त्यानंतर शेतातून पूर्वीच्या पिकाचे अवशेष गोळा करून शेताबाहेर काढणे गरजेचे ठरते. नांगरणी केल्यानंतर फळी मारून शेत सपाट करणे आवश्यक ठरते. लागवडीसाठी शेत जमीन भुसभुशीत असल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते.
फ्लावरच्या काही सुधारित जाती
जर आगात फ्लॉवर लागवड करायची असेल तर आपण पुसा दिवाली,अर्ली कुवारी, अर्ली पटना, पंत गोबी 2, पंत गोबी 3, पुसा कार्तिक इत्यादी जाती लागवड करून चांगली कमाई करू शकता.
तसेच फ्लावरच्या पंत शुभ्रा, इम्प्रोव्ह जपानी, हिसार 114 इत्यादी जातींची लागवड केली जाऊ शकते.
Share your comments