देशात सध्या सर्वत्र शेतकरी बांधव पारंपरिक शेतीला फाटा देताना दिसत आहेत. पारंपरिक शेतीऐवजी शेतकरी बांधव नगदी पिकांची व औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत. अनेक शेतकरी बांधव नेहमी डिमांडमध्ये असलेल्या झाडांची लागवड करत आहेत. बांबू देखील नेहमी डीमांड मध्ये असणारी वनस्पती आहे. म्हणून बांबूची शेती शेतकरी बांधवांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. सर्व शेतकरी बांधवांना बांबूची शेती करायची असेल तर त्यासाठी सरकार त्यांना प्रोत्साहित देखील करते. अनेक राज्य सरकारे बांबूच्या शेतीसाठी 50 टक्के पर्यंत सबसिडी प्रोव्हाइड करत असतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया बांबू शेती विषयी काही महत्त्वपूर्ण बाबी.
शेतकरी मित्रांनो बांबूची एकदा लागवड केल्यास या पासून सुमारे 40 वर्षांपर्यंत उत्पादन घेता येते. सरकारदेखील बांबूच्या शेतीसाठी प्रोत्साहन देत असते कारण की याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात कायम बनलेली असते. बांबूचा उपयोग कागद तयार करण्यासाठी केला जातो तसेच यापासून कार्बनिक कपडेदेखील बनवले जातात. कार्बनिक कपडे कॉटन पासून बनवण्यात आलेल्या कपड्या पेक्षा अधिक टिकाऊ असल्याने याची मागणी बाजारात नेहमी बनलेली असते आणि त्यामुळे बांबूच्या शेतीला खूप मोठा स्कोप प्राप्त होतो. बांबू पासून फक्त कागद आणि कपडाच बनविला जातो असे नाही तर बांबू पासून जैविक इंधन देखील अलीकडे तयार केले जात आहे जैविक इंधनाची वाढती मागणी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बांबूची लागवड तीन पद्धतीने केली जाते, बांबूची लागवड ही बियाणे पेरून, कलम पद्धतीने तसेच रायझोम पद्धतीने करण्यात येते. बांबूचे बियाणे खूप महाग असते शिवाय हे सहज रित्या उपलब्ध देखील होत नाही. बांबूच्या रोपाची किंमत ही त्याच्या जातीवर अवलंबून असते.
बांबूच्या शेतीसाठी विशेष अशी पूर्वमशागत करावी लागत नाही. मात्र असे असले तरी जमिनीची नांगरणी केल्यास अनावश्यक तण शेतात वाढत नाही. त्यामुळे जमिनीची नागरणी करूनच बांबूची लागवड करावी. आपण कोणत्याही जमिनीत बांबूची लागवड करू शकता. एका एकर क्षेत्रात 100 बांबूची रोपे लावली जाऊ शकतात. जर आपण 5×4 या अंतरावर बांबूची लागवड केली तर आपण एक एकर क्षेत्रात 250 रोप लागवड करू शकता. बांबूची लागवड 2 फूट रुंद आणि दोन फूट खोल अशा खड्ड्यात केली जाते. बांबूची रोपे लावल्यानंतर लगेच पाणी देणे आवश्यक असते. बांबूला एक महिन्यासाठी पाणी द्यावे लागेल. एक महिन्यानंतर दोन-तीन दिवसाआड पाणी दिले तरी चालते.
बांबूच्या लागवडीसाठी भारतातील वातावरण अनुकूल असल्याचे सांगितले जाते. काश्मीर सोडून देशातील इतर सर्व भागात बांबू लागवड केली जाऊ शकते. बांबूचे मागणीही दिवसेंदिवस वाढत असली तरी देखील त्याची लागवड ही पाहिजे तेवढी देशात बघायला मिळत नाही. त्यामुळे याची लागवड करून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करू शकता. बांबूची लागवड कधीही केली जाऊ शकते मात्र असे असले तरी बांबूच्या लागवडीसाठी थंड हवामान अनुकूल नसल्याचे सांगितले जाते. बांबूची लागवड 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेल्या प्रदेशमध्ये केली जाऊ शकत नाही. ज्या जमिनीत बांबूची लागवड करायची आहे त्या जमिनीचा पीएच 5 ते 6 दरम्यान असल्यास बांबूचे यशस्वी उत्पादन घेतले जाऊ शकते. वाळू युक्त माती असलेली जमीन बांबू लागवडीसाठी योग्य नसल्याचे सांगितले जाते.
Share your comments