1. कृषीपीडिया

अश्वगंधा लागवड करून कमवा बक्कळ पैसा, अश्वगंधा लागवड करतांना घ्या 'या' गोष्टींची काळजी

जगात औषधी वनस्पतींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना नामक महाभयंकर आजारापासून औषधी वनस्पतींची मागणी जोर पकडू लागली आहे. म्हणूनच आता मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव औषधी वनस्पतीची लागवड करताना नजरेस पडत आहेत. देशात तसेच राज्यात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत. औषधी वनस्पतींची लागवड शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरताना दिसत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
ashwagandha farming

ashwagandha farming

जगात औषधी वनस्पतींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना नामक महाभयंकर आजारापासून औषधी वनस्पतींची मागणी जोर पकडू लागली आहे. म्हणूनच आता मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव औषधी वनस्पतीची लागवड करताना नजरेस पडत आहेत. देशात तसेच राज्यात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत. औषधी वनस्पतींची लागवड शेतकऱ्यांसाठी  अनेक प्रकारे फायदेशीर ठरताना दिसत आहे.

औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी खर्च हा जवळपास नगण्य असतो म्हणून कमी इन्वेस्टमेंट मध्ये जास्त उत्पन्न प्राप्त करून देत असल्याने औषधी वनस्पतींची लागवड दिवसेंदिवस वधारतांना दिसत आहे. शिवाय औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी सरकारदरबारी देखील अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत सरकार शेतकऱ्यांना औषधी वनस्पती लागवडीसाठी प्रोत्साहित देखील करते. म्हणून देशात औषधी वनस्पतींचे क्षेत्र कमालीचे वाढलेले नजरेस पडत आहे. अश्वगंधा देखील अशाच एक औषधी वनस्पती पैकी एक आहे अश्वगंधा लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. अश्वगंधा या वनस्पतीपासून अनेक प्रकारच्या औषधांची निर्मिती केली जाते, तसेच याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणून अश्वगंधाला बारामाही खूप मोठी मागणी असते. अश्वगंधा वनस्पतीचे फळ बिया मुळे पाने इत्यादी भाग विक्री केले जातात तसेच या वनस्पतीची किंमत देखील चांगली मिळते. त्यामुळे याची लागवड अलीकडे मोठ्या प्रमाणात केली जात आहे. म्हणून आज आपण अश्वगंधा लागवड विषयी महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.

अश्वगंधा लागवडीतील काही महत्त्वपूर्ण बाबी

अश्वगंधा लागवड चिकन माती असलेल्या व लाल माती असलेल्या जमिनीत केल्यास त्यापासून अधिक उत्पादन प्राप्त करता येते. ज्या जमिनीत अश्वगंधा ची लागवड करायची आहे त्या जमिनीचा पीएच 7.5 ते 8 दरम्यान असायला हवा. सामान्यतः अश्वगंधा लागवड ही उष्ण प्रदेशातच केली जाते. अश्वगंधा पिकासाठी पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत चे तापमान उत्तम असल्याचे जाणकार लोक सांगतात. ज्या प्रदेशात 500 ते 750 मिली पाऊस पडतो त्या प्रदेशात अश्वगंधा लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. अश्वगंधा पिकासाठी शेतात पुरेसा ओलावा असणे आवश्यक असते. अश्वगंधा लागवडीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याची लागवड डोंगराळ प्रदेशात तसेच कमी सुपीक असलेल्या जमिनीत देखील केली जाऊ शकते.

शेतकरी मित्रांनो अश्वगंधाची लागवड ऑगस्ट महिन्यात केली जाते. याच्या लागवडीत पूर्वमशागत करणे देखील महत्त्वाचे असते दोन-तीन पाऊस पडल्यानंतर शेतीची पूर्व मशागत केली गेली पाहिजे. साधारणत दोन पावसानंतर शेत चांगले नांगरून घ्यावे व त्यानंतर फळी मारून शेत चांगले भुसभुशित केले गेले पाहिजे. जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर जमिनीत शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकले जाते. अश्वगंधा लागवडीसाठी प्रति हेक्‍टरी 12 किलो बियाणे आवश्‍यक असते. अश्वगंधा बियाणे पेरल्यानंतर सुमारे बारा दिवसात बियाणे अंकुरण्यास प्रारंभ होतो. अश्वगंधा लागवड दोन पद्धतीने केली जाते एक तर पेरणी यंत्राने पेरणी केली जाते आणि दुसरी म्हणजे पारंपारिक पद्धतीने टोपण केले जाते. अश्वगंधा पेरणी केल्यानंतर याची काढणी जानेवारी ते मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत केली जाते. अश्वगंधा ची झाडे उपटली जातात व त्याची मुळे वेगळे करून सुकवली जातात. तसेच यांच्या फळांची तोडणी करून फळातून बिया वेगळ्या केल्या जातात, तसेच पानांना देखील वेगळे केले जाते. साधारणता एक हेक्‍टर क्षेत्रातून 800 किलो ग्रॅम पर्यंत मुळी प्राप्त होते तर 50 किलोग्राम पर्यंत अश्वगंधा च्या बिया प्राप्त होतात.

English Summary: start ashwagandha farming and earn more profit Published on: 14 January 2022, 03:34 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters