1. कृषीपीडिया

'या' पद्धतीने करा कोरफड लागवड; मिळेल बंपर उत्पादन, शेतकरी राजा होणार मालामाल

अलीकडे औषधी वनस्पतीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे, तसेच या वनस्पतींना खूप मोठी मागणी देखील आहे म्हणून शेतकरी यातून चांगली मोठी कमाई करत आहेत. आज आपण अशाच एका औषधी वनस्पतीच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत, आज आपण कोरफड विषयी जाणून घेणार आहोत कोरफड लागवड करून राज्यात अनेक शेतकरी चांगली मोठी कमाई करत आहेत याची लागवड आता भारतात बर्‍यापैकी नजरेला पडत आहे. कोरफडला इंग्रजीत एलोवेरा असे संबोधले जाते. कोरफड औषधी गुणांनी भरपूर असते, कोरफडमध्ये असलेले पोषक घटक आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी उपयोगाची असल्याचे सांगितले जाते. कोरफडची भाजी देखील बनवली जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Aloe Vera

भारतात व्यवसायिकदृष्ट्या कोरफडची लागवड आता बर्‍यापैकी नजरेला पडत आहे. एलोवेराचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी तसेच कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्यामुळे याची मागणी अलीकडे चांगलीच वधारली आहे, म्हणून कोरफड लागवड शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. एलोवेरा लागवडीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलोवेरा एकदा लागवड केल्यानंतर पाच वर्षे उत्पादन देण्यास सक्षम असते. असे सांगितले जाते की, जर एक एकर क्षेत्रात एलोवेरा लागवड केली गेली तर त्यापासून प्रत्येक वर्षी वीस हजार किलोग्राम एलोवेराचे उत्पादन होते. एलोवेरा ची पाने पाच ते सहा रुपये किलोने विकली जातात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया एलोवेराच्या लागवडीविषयी काही महत्त्वपूर्ण बाबी.

एलोवेरा लागवडिविषयी महत्वपूर्ण बाबी

  • एलोवेरा लागवड अशा जमिनीत केली गेली पाहिजे ज्या जमिनीत जास्त ओलावा नसतो, तसेच पावसाळ्याचे पाणी एलोवेरा लागवड केलेल्या जमिनीत साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • एलोवेरा लागवड पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत केली केली तर उत्पादन चांगले मिळते. एलोवेरा लागवडीसाठी वाळूयुक्त जमीनउत्तम असल्याचे सांगितले जाते.
  • तसं बघायला गेलं तर कोरफड लागवड ती कधीही करता येऊ शकते, मात्र हिवाळ्यात याची लागवड केली तर विकास वाढीसाठी अडचणी निर्माण होतात. म्हणून एलोवेरा लागवड फेब्रुवारी पासून नोव्हेंबर पर्यंत केली जाऊ शकते.
  • एक बिघाभर शेतात 12 हजार कोरफडीची रोपे लावली जाऊ शकतात. एलोवेराच्या एका रोपाची किंमत ही जवळपास पाच रुपयेच्या आसपास असते, कोरफडच्या एका रोपातून सुमारे 3.5 किलो कोरफडची पाने मिळतात आणि एका किलो पानाची किंमत सुमारे 5 ते 6 रुपये असते. तसे पाहता, एका कोरफडची पाने सरासरी 18 रुपयांपर्यंत विकली जातात. अशा परिस्थितीत 40 हजार रुपयांची गुंतवणूक करून शेतकरी अडीच लाख रुपयांपर्यंत कमवू शकतो. म्हणजेच कोरफडीच्या लागवडीतून एकूण 5 पट नफा मिळू शकतो.
English Summary: start alovera farming and earn more profit Published on: 25 December 2021, 04:44 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters