मसाला शेती आहे नफा देणारी ; वाचा लसणाची लागवड पद्धत

30 January 2021 07:27 PM By: KJ Maharashtra

जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी लसूण हा सर्वात महत्वाचा घटक असतो. मसाल्यातही लसणाचा उपयोग केला जातो. इतकेच काय लसणाचे काही औषधी गुण सुद्धा आहेत. पोटाच्‍या विकारावर पचनशक्‍ती, कानदुखी डोळयातील विकार डांग्‍या खोकला इत्‍यादीवर उपचारासाठी गुणधर्मही लसणात आहेत.

महाराष्‍ट्रात जवळ-जवळ पाच हजार हेक्‍टर जमीन हया पिकाखाली असून नाशिक, पुणे, ठाणे तसेच मराठवाडा व विदर्भात लागवड केली जाते.

हवामान व जमीन

समशितोष्‍ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्‍त असते. मात्र अति उष्‍ण व अति थंड हवामान या पिकास मानवत नाही. या पिकाच्‍या वाढीच्‍या काळात 75 सेमी पेक्षा जास्‍त पाऊस पडत असल्‍यास पिकाची वाढ चांगली होत नाही. याकरिता ऑक्‍टोबर महिन्‍यात केलेली लागवड अधिक उत्‍पादन देते. दिवसाचे 25 ते 28 अंश सेल्सिअस व रात्रीचे 10 ते 15 अंश सेल्सिअस तापमानात गडयांची वाढ चांगली होते.

मध्‍यम खोलीच्‍या भरपूर सेंद्रीय खते घातलेल्‍या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत पीक चांगल्‍याप्रकारे घेता येते. हलक्‍या प्रकारच्‍या जमिनी, चिकण मातीच्‍या जमिनी लागवडीस योग्‍य नसतात.

मशागत

मध्‍यम खोलीची नांगरट करुन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करते वेळी हेक्‍टरी 30 गाडया (15 टन) शेणखत मिसळावे. वर पाणी देण्‍यास सोईस्‍कर अशा आकाराचे (3×2) अथवा (3.5×2मी) सपाट वाफे तयार करावेत.

जाती व लागवड

महाराष्‍ट्रात पांढ-या रंगाच्‍या जामनगर जातीची तसेच गोदावरी, श्वेता या जातीची लागवड केली जाते. लसणाची लागवड ऑक्‍टोबर-नोव्‍हेबर महिन्‍यात साध्‍या वाफयात कोरडया 10×7.5 सेमी वर करतात. गडडे फोडून पाकळया किंवा काडया सुटया करुन टाकून मातीने झाकतात. त्‍यासाठी हेक्‍टरी 500 ते 600 किलो कुडयाच्‍या स्‍वरुपात बियाणे लागते. लागण झाल्‍यानंतर कुडया निघणार नाहीत असे पाणी द्यावे.

 

बियाण्‍याची निवड

लसणाच्‍या गाठया एकावर एक अशा गोलाकार पाकळयांनी बनलेली असते. गाठयातील पाकळया सुटया करण्‍यासाठी गडडे पायाखाली तुडवून मग साफ केल्‍या जातात. लागवडीसाठी मोठया निरोगी व परिपक्‍व पाकळयांच्‍या उपयोग करावा.

वरखते

लावणीच्‍या वेळी लसणास हेक्‍टरी 50 किलो युरिया 300 किलो सुपर फॉस्‍फेट व 100 किलो म्‍युरेट ऑफ पोटॅश मिसळून द्यावा म्‍हणजे पिकांची वाढ जोमदार होते.

आंतर मशागत

लसणाच्‍या पाकळया लावल्‍यानंतर एक महिन्‍याने खुरपणी करुन गवत काढून घ्‍यावे. त्‍यानंतर तण पाहुन 1-2 वेळा निंदणी करावी. लागवडीनंतर अडीच महिन्‍यांनी लसणाचे गाठे धरण्‍यास सुरुवात होते. यावेळी हात कोळपणी करुन माती चांगली मोकळी ठेवावी म्‍हणजे मोठया आकाराचे व चांगले भरदार गाठे धरण्‍यास मदत होते. त्‍यानंतर खुरपणी अथवा कोळपणी करू नये.

पाणी व्यवस्थापन

लावणीनंतर पाण्‍याची पहिली पाळी सावकाश द्यावी. दुसरी पाळी त्‍यानंतर 3-4 दिवसांनी आणि पुढच्‍या हवामानानुसार 8 ते 12 दिवसांनी द्याव्‍यात. गडडे पक्‍के होताना वर पाण्‍याच्‍या दोन पाळीतील अंतर वाढवावे. काढणीच्‍या दोन दिवस अगोदर पाणी द्यावे. त्‍यानंतर वरपाणी देऊ नये. म्‍हणजे गड्डे काढणे सोपे जाते व गड्डे फुटले जात नाही.

कीड व रोग

बोकडया : ही कीड पानातील रस शोषूण झाडे अशक्‍त बनवतात.

उपाय

सायपर मेथ्रीन 25 टक्‍के प्रवाही 5 मिली 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

रोग

करपा व भुरी : या दोन्‍ही रोगांमुळे अनुक्रमे पाने गर्द तांबडया रंगाची व पांढ-या रंगाची होतात व अटळ स्थितीत झाडे मरतात.

 

उपाय

लावणीनंतर साडेचार ते पाच महिन्‍यांनी हे पीक काढणीस योग्‍य होते. पिवळी पडावयास लागली म्‍हणजे गाठे काढावयास तयार झाले असे समजावे. लसूण पातीसह तसाच बांधून ठेवावा म्‍हणजे ८-१० महिने टिकतो. विक्रीसाठी पाती कापून गडडे स्‍वच्‍छ करुन आकाराप्रमाणे प्रतवारी करुन बाजारात पाठवतात. जमिनीचे पोत, खते व जात यावर लसणाचे उत्‍पादन अवलंबून असते. दर हेक्‍टरी ९ ते १० टन उत्‍पादन मिळते.

cultivating garlic garlic farming garlic cultivating method लसणाची लागवड लसणाची शेती
English Summary: Spice farming is a profitable, read method of cultivating garlic

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.