1. कृषीपीडिया

विशेष - ५ डिसेंबर जागतिक मृदा दिन -नीलेश भागवत सदार

KJ Maharashtra
KJ Maharashtra
विशेष - ५ डिसेंबर जागतिक मृदा दिन- नीलेश भागवत सदार

विशेष - ५ डिसेंबर जागतिक मृदा दिन- नीलेश भागवत सदार

भारताने सुद्धा 2070 पर्यंत कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन मुक्त होण्याचे लक्ष ठरवले. बदलते हवामान हा विषय आता तर ग्रामीण भागात सुद्धा चर्चेला असतो, म्हणजे याचा क्रम आता ग्रामीण - शहर - राज्य -देश -जग असा झाला आहे. कारण हवामान बदलाचा फटका ग्रामीण भागापासून तर विकसित विकसनशील गरीब देशांना बसत आहे.

मागील दोन दशकात हवामान बदलाचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. म्हणजे आता ऋतू बदललेले आहेत असे म्हणायला खूप मोठा वाव आहे. या ऋतू बदलाचा सर्वात जास्त फटका शेतीला बसत आहे. कधी अचानक धो-धो पडणारा पाऊस काही मिनिटातच जमिनीचा सुपीक भाग अगदी कळत- नकळत घेऊन जात आहे.

जमिनीच्या जमिनी खरडून जात आहेत. आपल्याला माहिती आहे एक इंच सुपीक जमिनीचा भाग तयार होण्यासाठी साधारण 400 ते 1000 वर्षाचा कालावधी लागतो. तर तोच सुपीक भाग काही मिनिटातच नाहीसा होत आहे. शेतीच्या दृष्टीने विचार केला असता मातीचा चार इंचाचा थर शेतीसाठी उपयुक्त असतो. या थरांमध्ये पिकाच्या वाढीसाठी लागणारी आवश्यक मूलद्रव्ये असतात. पाण्या सोबत माती + पोषक मूलद्रव्य वाहून जातात त्याचा परिणाम जमिनीची सुपीकता कमी होत आहे, पिकाची उत्पादकता घटत आहे, जमीन नापीक बनत आहेत, काही भागात तर अशा अचानक धो-धो पाऊस मुळे संपूर्ण मातीचा थर वाहून जातो आणि खडक उघडा पडतो. अशा ठिकाणी येणाऱ्या काळात पुन्हा शेती करणे अशक्यप्राय होऊन बसेल. पाणी ,वारा या पासून जमिनीची धूप थांबवणे ही आता शेतकऱ्यांसमोर एक समस्या होऊन बसली आहे .

दुसरी अजून एक समस्या बहुतेक करून शहरी भागाच्या जमिनीमध्ये पाहायला मिळते आणि ती म्हणजे जमिनीचे/ मृर्दा प्रदूषण होय. औद्योगिक सांडपाणी, शहरी सांडपाणी प्रक्रिया न करता तसेच जमिनीमध्ये सोडले जाते (पिकांना दिले जाते) किंवा वापरले जाते.

त्यामुळे मृर्दा प्रदूषण होते याचा फटका सुपीक जमिनी सोबतच व मानवाच्या आरोग्याला सुद्धा आहे. जमीनीवर टाकलेल्या उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, रासायनिक टाकाऊ घटक, यांच्यामुळे जमीन नापीक होत आहे. औद्योगिक व शहरी सांडपाण्यामुळे जमिनीत काही जड धातूचा( हेवी मेटल्स) शिरकाव होऊन जमिनीतून पिकात (फळे भाजीपाला, अन्नधान्य पिके) पिकातून मानवी शरीरात शिरकाव होण्याचा धोका आहे .या मध्ये कोबाल्ट, लीड आर्सेनिक, लोह, इत्यादी धातूंचा समावेश होतो. मृर्दा प्रदूषणामुळे रोगांच्या साथी येऊ शकतात. रासायनिक खते हे जमिनीतील चांगले पीक यावे यासाठी करतात , परंतु दिवसेंदिवस जमिनीत यांचा वापर असमतोल, बेहिशोबी , अयोग्यवेळी व अति प्रमाणात वापर करणे हे सध्या जमिनीच्या प्रदूषणाचे कारण बनत आहे. कीटकनाशके, तणनाशके यांच्या वापर अमर्यादित व वारंवार जमिनीत मिसळल्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. शेत जमिनीतील शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतू चा नाश होत आहे व त्यामुळे जमीन नापीक बनत आहे . मृर्दा प्रदूषण मुळे जमिनीची सुपीकता कमी होते. याचा परिणाम मातीच्या जैविक गुणधर्मावर होतो.प्रदूषित माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाते आणि नद्या व तलामध्ये जाते व यामुळे पाण्याचे प्रदूषण होते.

जगाची वाढत जाणारी लोकसंख्या व मर्यादित असा नैसर्गिक घटक असलेली मृदा. बदललेल्या हवामानामुळे येणाऱ्या काळात शेती क्षेत्राला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.जमिनीची धूप ,मृर्दा प्रदूषण , वाढलेले तापमान, अवेळी येणार धो धो पाऊस अशा असमतोल नैसर्गिक घटकांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज बनली आहे. जमीन जिवंत ठेवून तीच आरोग्य सांभाळणे ही आता गरज झाली आहे. जागतिक मृदा दिन निमित्त मृर्दा या नैसर्गिक व मर्यादित घटकावर आजच्या दिवशी जगभर विचारमंथन होणे ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु नुसती विचारमंथन न करता जमिनीची धूप व प्रदूषण कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल हे पाहणे सुद्धा गरज आहे. त्या दिशेने कृती करणे हे शाश्वत विकासासाठी व येणाऱ्या आपल्या पिढ्यांसाठी खूप महत्त्वाचे व गरजेचे आहे.

"जमिनीचे आरोग्य म्हणजेच मानवजातीचे आरोग्य होय"

 

 लेखक- 

  1.नीलेश भागवत सदार

  सहाय्यक प्राध्यापक - डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव खान्देश.

Mobile - 9527202126

Mail -sadarnilesh1@gmail.com

  1. वैभव संजय पाटील

सहाय्यक प्राध्यापक-डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters