भारतात सोयाबीन शेतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन उत्पादनाच्या (Soybean Production) बाबतीत मध्यप्रदेश पाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अशा परिस्थितीत सध्या सोयाबीन बाजारात कोणत्या दरात विकला जातोय, बाजारभाव काय चालू आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. महाराष्ट्रात बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे आजचे 16 ऑगस्टचे सोयाबीनचे ताजे बाजार जाणून घेऊया.
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत खळबळजनक माहिती आली समोर! अपघाताआधी 3 ऑगस्टला...
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती
आज राहता कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 33 क्विंटल सोयाबीनची आयात झाली आहे. याठिकाणी सोयाबीनला 6,149 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला, तर कमीत कमी 6050 बाजार भाव मिळाला. तसेच सर्वसाधारण बाजार भाव सहा हजार 100 मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 165 क्विंटल आवक झाली. याठिकाणी सोयाबीनला सहा हजार 251 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला, तर कमीत कमी बाजार भाव 5 हजार 451 रुपये. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 6050 एवढा मिळाला आहे.
Electric Scooters: Hero एलेक्ट्रिक स्कूटर फक्त 10 हजार रुपयात घरी घेऊन या; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 1493 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. याठिकाणी आज 6 हजार 280 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला, तर किमान बाजार भाव 5 हजार 100 एवढा मिळाला. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 6 हजार 195 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
'या' योजनेत फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करा आणि मिळवा 75 हजार रुपयांचा लाभ; जाणून घ्या
Ration Card: आता 'या' योजनेअंतर्गत रेशन कार्ड सहज होणार उपलब्ध; जाणून घ्या प्रक्रिया
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने दिली 'ही' मोठी सवलत; जाणून घ्या
Share your comments