Soybean Farming: राज्यात खरीप हंगामात (Kharif Season) सोयाबीन या नगदी पिकाची (Cash crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बहुतांशी भागात सध्या सोयाबीन पीक (Soybean crop) फुलोरा अवस्थेत आहे. मित्रांनो खरे पाहता या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे तसेच ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले.
सोयाबीन या खरीप हंगामातील मुख्य पिकाची देखील मोठ्या प्रमाणात क्षती यामुळे झाली आहे. सध्या नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्या सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावड बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन पीक व्यवस्थापन (Soybean Crop Management) करत असल्याचे चित्र आहे.
मित्रांनो शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकावर आलेल्या रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीन पिकावर येणाऱ्या पिवळा मोझँक रोगाच्या (Soybean disease) नियंत्रणाविषयी (Soybean pest control) माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो सोयाबीन पिकासाठी पिवळा मोझँक रोग अतिशय घातक आहे.
या रोगामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होते. म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत आजची ही माहिती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.
सोयाबीन पिकासाठी घातक ठरणारा पिवळा मोझँक रोग
जाणकार लोकांच्या मते, सोयाबीन पिकावर हा रोग पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. अर्थातच या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वप्रथम पांढरी माशीवर नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक ठरणार आहे. यामुळे आज आपण सोयाबीन पिकावर येणाऱ्या पांढरी माशी कीटकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाऊ शकते हे जाणून घेणार आहोत.
पिवळा मोझँक रोगावर या पद्धतीने मिळवा नियंत्रण
या रोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या पांढरी माशीच्या जैविक नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरण्याचा सल्ला दिला जातो. जाणकार लोकांच्या मते या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकरी दहा पिवळे चिकट सापळे वापरले पाहिजे. तसेच या माशीवर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी थायमिथोकझाम 25% एकरी 40 ग्राम या प्रमाणात घेऊन फवारणी केली पाहिजे.
मित्रांनो येथे दिलेली माहिती ही अंतिम राहणार नाही. कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्याअगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक राहणार आहे.
Share your comments