1. कृषीपीडिया

रब्बीमध्ये ज्वारीची जागा घेतली सोयाबीन आणि हरभरा पिकाने! ज्वारीचे क्षेत्र कमी झाल्याने दरवाढीची शेतकऱ्यांची अपेक्षा

रब्बी हंगामातील पिकांनी अनेक संकटांना मात करत अंतिम टप्पा गाठलेला आहे. मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये सध्या सुगीची कामे सुरू असून ढगाळ वातावरणाच्या सावटाखाली ज्वारी पिकाची काढणी सुरू आहे. मजुरांच्या टंचाईमुळे आणि अचानक पडणाऱ्या पावसाच्या धास्तीमुळे शेतकरी रात्रीचा दिवस करून शेतीकामे उरकत आहे. यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पारंपरिक पिके न घेता कडधान्यावर भर दिलेला आहे. यंदा ज्वारी ला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. ज्वारी जरी रब्बी हंगामातील पीक असेल तरी त्याची जागा यंदा हरभरा आणि सोयाबीन पिकाने घेतली आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
Soybean

ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली :-

मराठवड्यात मागील ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण झाले आहे. आता जर पाऊस झाला तर शेतीमालावर परिणाम होणार असल्याने पीक काढणीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांची काढणी सुरू आहे. मजुरांच्या हजरीत वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण कुटुंब शेतात राबत आहे. याआधी ज्वारी उपटून काढली जायची मात्र आता ज्वारी ची कापणी केली जाते. निसर्गाचा लहरीपणा रब्बीमधील पिकांवर ओढू नये यासाठी शेतकऱ्यांनी कसरत चालू केली आहे.

उत्पादन घटल्याने दरात वाढ होण्याचा अंदाज :-

ज्वारी ची पेरणी केल्यापासून तर ज्वारी ची काढणी पर्यंतचे कष्ट आणि बाजारात कसलाच दर नसल्याने ज्वारी उत्पादनात मोठी घट झालेली आहे. यंदा ज्वारी चा कमी क्षेत्रावर पेरा झालेला आहे त्यामुळे उत्पादनात घट ही ठरलेली आहे. जे की या घटत्या उत्पादनामुळे यंदा ज्वारी ला अधिकचा दर भेटवल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या बाजारपेठेत ज्वारी ला प्रति क्विंटल २५०० ते ३ हजार दर मिळत आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी :-

मराठवड्यात ढगाळ वातावरण झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काढणी झाली की लगेच पिकांना सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. जे खरिपात झाले ते रब्बीमध्ये होऊ नये त्यामुळे सुरक्षा घेणे गरजेचे आहे. सध्याच्या ढगाळ वातावरण पडल्याने ज्वारीची कणसे काळवंडण्याचा धोका असतो. कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सल्ला दिला आहे की काढणी, मोडणी आणि लागलीच मळणी कामे उरकून पीक पदरात पडून घ्यावे.

English Summary: Soybean and gram crop replaced sorghum in Rabbi! Farmers expect price hike due to reduction in sorghum area Published on: 23 March 2022, 06:03 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters