1. कृषीपीडिया

सोयाबीन, वायदेबंदी आणि चीन.

2003 साली सुरू झालेल्या NCDEX, MCX या कमोडिटीची फ्युचर्स मार्केटच्या - ऑईलाईन वायदेबाजाराच्या इतिहासातील सर्वांत कठिण दिवस म्हणून 19 डिसेंबर 2021 ची नोंद होईल.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
सोयाबीन, वायदेबंदी आणि चीन.

सोयाबीन, वायदेबंदी आणि चीन.

केंद्रीय अर्थ मंत्रालयातील भांडवली बाजार विभागाचे उपसचिव मनिषकुमार झा यांनी ता. 19 रोजी सेबीला एक पत्र पाठवून सोयाबीनसह नऊ शेतमाल वस्तूंचे (कमोडिटी फ्युचर्स) वायदे व्यवहार एका वर्षासाठी सस्पेंड करावेत असे निर्देश दिलेत. अर्थातच सेबीने तत्काळ आपल्या अंतर्गत येणाऱ्या एमसीएक्स व एनसीडीईएक्सला म्हणजे ऑईलाईन फ्युचर्स मार्केटला वायदे सस्पेंशनचे आदेश निर्गमित केलेत. आणि पुढे एमसीईक्स, एनसीडीईएक्सने याची अमंलबजावणी करत सर्व मेंबर्स म्हणजेच ब्रोकर्सला कळवले. नव्या निर्बंधानुसार संबंधित पिकातील वायद्यांत यापुढे खरेदी विक्रीचे म्हणजेच बाय-सेल चे नवे सौदे होणार नाहीत. केवळ चालू पोझिशनमधून निघण्याची सुविधा असेल फक्त स्वेअर अप सौदे होतील. म्हणजे ज्यांनी खरेदी केले त्यांनी विकावे आणि ज्यांनी विकले असेल त्यांनी खरेदीचा तांत्रिक सोपस्कार करून बाहेर पडावे.

वायदे बाजारामुळे महागाई वाढते सट्टेबाजी वाढते आणि रोजच्या मोठ्या चढउतारामुळे व्यापार करणे अवघड होते, असे सोपा संघटनेसह वायदेबंदी समर्थकांचे मत आहे. तर वायदे बाजारामुळे महागाई वाढते असा एकही शास्त्रीय पुरावा नाही, आणि दैनंदिन चढ-उतार रेंज कमी कमी करून, मार्जिन वाढवून मोठे चढ-उतार रोखता आले असते त्यासाठी डायरेक्ट वायदेबंदी करणे योग्य नाही,

असे वायदे समर्थकांचे मत आहे शेतकऱ्यांसाठी वायदे बाजार आहे, पण वायदेबाजारात शेतकरी नाही असे म्हटले जाते ते खरेच आहे शेतकऱ्यांचा सहभाग नाहीच्या बरोबरीत असला तरी, वायदेबाजारामुळे भविष्यातील बाजारभावाची दिशा कळते, पिक लावण्यापूर्वीच त्याचा बाजारभाव कळतो, म्हणून ही व्यवस्था टिकली पाहिजे, असे सर्व साधारण शेतकरी व शेतकरी संघटनांचे मत आहे तसेच बहुतांश कॉर्पोरेट्स कारभाऱ्यांनाही जोखिम व्यवस्थापन (हेजिंग) आणि प्राईस डिस्कव्हरीसाठी फ्युचर्स मार्केट प्लॅटफॉर्म हवा आहे.

भारतातील एमसीएक्स आणि एनसीडीईएक्स या प्लॅटफॉर्म रचना सीबॉट म्हणझे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडच्या धर्तीवर सुरु झाली होती. सीबॉट हे 1885 मध्ये स्थापन झालेय. खरे तर वायदाबाजार ही संकल्पना भारतासाठी नवी नाही प्राचीन काळापासून भारतात वायदे व्यवहाराच्या नोंदी आहेत.1875 मध्ये बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिशएशन वायदे व्यवहारात कार्यरत होती. त्या तुलनेत चीनमध्ये दलियन कमोडिटी एक्स्चेंज अलिकडेच, 1993 मध्ये स्थापन झालेय. अमेरिकेतील सीबॉट एक्स्चेंजला टक्कर देईल या दिशेने दलिनय एक्स्चेंजची वाटचाल सुरू आहे.

सोयाबीन, सोयातेल, पामतेलसह सर्व महत्त्वाच्या कमोडिटीजचा फ्युचर्स ट्रेड साम्यवादी चीनमध्ये जोमात सुरू आहे. अर्थात, साम्यवादी चौकटीतील कडक रेग्युलेशन्ससह दलियन फ्युचर्स एक्स्चेंज मोठे होवू शकते तर लोकशाही असलेल्या भारतात फ्युचर्स एक्स्चेंज का गोत्यात आले आहे, हे कळत नाहीये. जगातील पहिल्या पाचात दलियन एक्स्चेंजची गणना होते आणि जगभरात ट्रेड होणाऱ्या 15 कमोडिटीतील 9 कमोडिटीज आजघडीला दलियन एक्स्चेंजमध्ये ट्रेड होताहेत.फ्युचर्स मार्केटमध्ये अतिरिक्त व अवास्तव सट्टेबाजी रोखली पाहिजे हे मान्य पण सट्टेबाजीवर निर्बंध आणण्याऐवजी मार्केटच बंद करण्याचा प्रकार घडला आहे मूळ रोगापेक्षा इलाज भयंकर असे वर्णन करता येईल.शेती रिफॉर्म्समध्ये सक्षम कमोडिटी फ्युचर्स मार्केट अपेक्षित होते पण आजघडीला कमोडिटी फ्युचर्स संदर्भात तरी देशाची ही रिफॉर्म ऐवजी डिफॉर्मकडे वाटचाल सुरू झालीय काय, असे वाटण्याजोगे चित्र दिसतेय.

एका वर्षांसाठी सस्पेंड झालेल्या वायद्यांत धान, गहू, चना, मोहरी, सोयाबीन, हायप्रो सोया डीओसी, सोया तेल, कच्चे पाम तेल आणि मुंग, सोयाडेक्सचा समावेश आहे. ग्वॉर कॉम्प्लेक्स, सरकी पेंड, एरंडी, हळद, धनिया, जिरा आदी वस्तूंचे व्यवहार सुरू राहतील.

 

- दीपक चव्हाण

English Summary: Soyabin vaydemandi and chin Published on: 21 December 2021, 08:54 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters