गेल्या १० वर्षामध्ये सोयाबीन हे विदर्भ व मराठवाड्यात सर्वात जास्त क्षेत्रावर घेतले जाणारे प्रथम क्रमांकाचे पीक आहे, विदर्भ व मराठवाड्यात ७०-८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते त्याचबरोबर शेती पद्धतीमध्ये झालेले बदल व यांत्रिकीकरण यामुळे बैल व इतर गुरांची संख्या अतिशय कमी झाली आहे त्यामुळे शेतामधून निघणारा चारा किंवा भूस/ कुटार यांची बैल व गुरे नसल्यामुळे शेतकरी ते शेतात पसरून देतात किंवा जाळून टाकतात किंवा तो गंज बांधावर तसाच ठेवतात. तसेच सोयाबीन हे एकमेव पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते त्यामुळे पीक फेरपालट कुठेही दिसून येत नाही.
याचा परिणाम असा होतो
की पुढील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा / खोड किडा / कॉलर रॉट @ असे किडींचा व रोगाचा प्रादुर्भाव होतो त्याचे कारण # मागील ३-४ वर्षीच्या अनुभवानुसार जे शेतकरी कुटार शेतात पसरून देतात किंवा तसेच शेतात खूप दिवस पडू देतात त्या शेतामध्ये चक्री भुंगा व कॉलर रॉट चा प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला आहे.
आपण पीक फेरपालट करत नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील सोयाबीन चे कुटार हे गुरांसाठी वापरावे किंवा त्याचे कंपोस्ट खत बनवावे ( जिवाणू कल्चर चा वापर करून ते चांगल्या प्रकारे कुजल्यवर च त्याचा कंपोस्ट म्हणून वापर करावा ) .
अपना सोयाबीन ची सोगणी करतो तेव्हा बरेच ठिकाणी आपल्याला चक्री भुंगा/ खोड किडा व कॉलर रॉट चा प्रादुभाव झालेला आपल्याला दिसतो, आपण त्याची मळणी करतो, परंतु त्या खोडामद्ये आळी सुप्तावस्थेत असते किंवा कोषावस्थेत ( pupa) असतो ( पिवळ्या रंगाचा) तो त्या अवस्थेमध्ये तसाच राहतो व आपण तेच भुस् जर शेतात टाकले तर तो जमिनीमध्ये ( dormant stage ) ला असतो,
( पिवळ्या रंगाचा) तो त्या अवस्थेमध्ये तसाच राहतो व आपण तेच भुस् जर शेतात टाकले तर तो जमिनीमध्ये ( dormant stage ) ला असतो, जेव्हा पुढील हंगामात पाऊस पडला की आपण पेरणी करतो त्यावेळी तो adult अवस्थेत येऊन चक्री भुंगा म्हणून आपल्या सोयाबीन वर पेरणी नंतर २५-३० दिवसांनी दिसतो तेव्हा चक्री भुंग्याची मादी २ चक्राकार करून तिथे अंडे घालते ( मादी ) व त्यानंतर परत त्यापासून आळी तयार होते व ती खोड पोखरत खाली जाते व परत सुप्त व कोषावस्थेमध्ये जाते अशी हि cylcle चालू असते त्यामुळे आपल्याला cycle ब्रेक करणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी सोयाबीन चे कुटार शेतात टाकू नये त्याचे शेताच्या बाहेर कंपोस्ट करावे किंवा ( त्यातील ज्या जाड - जाड कड्या आहेत त्या जाळून टाकाव्या ) किंवा जिवाणू कल्चर चां वापर करून ते सडवावे व त्याचे चांगले कुजलले कंपोस्ट खत तयार करावे व ते वापरावे.
चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात. त्या पूर्ण भरत नाहीत. पीक काढणीवेळी खापा केलेल्या जागेतून खोड तुटून पडते. त्यामुळे देखील आपल्या सोयाबीन चे खूप नुकसान होते. अळी 34 ते 38 दिवसांनी कोषावस्थेत जाते. यापैकी काही अळ्या पुढील पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेत जातात, तर काही अळ्या कोषामध्ये जातात.
कोषातून आठ ते नऊ दिवसांनी प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात. हे भुंगे अंडी देतात. अंड्यांतून अळ्या निघून पिकास नुकसान करतात. पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्या सुप्तावस्थेत जातात. अशा प्रकारे चक्री भुंग्यांचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात. एका प्रकारामध्ये वर्षभरात एकच जीवनक्रम तर दुसऱ्या प्रकारामध्ये दोन जीवनक्रम पार पडतात. सुप्तावस्था झाडाच्या खोडात राहते. पहिला पाऊस झाल्यानंतर अळीची सुप्तावस्था संपते व ती कोषावस्थेत जाते. कोषातून प्रौढ भुंगा बाहेर येतो व अंडी घालतो. यासर्व गोष्टीचा विचार केला तर मागील हंगामाचा विचार केला तर चक्री भुंगा व खोड किडा यामुळे सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, कोणतेही कीटकनाशक चक्री भुंगा या किडीला १०० टक्के नियत्रन देत नाही व त्यावर आपला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो व उत्पादन कमी येते त्यासाठी पुढील हंगामात चक्री भुंगा / खोड किडा / कॉलर रॉट यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या शेतातील सोयाबीन चे भूस / कुटार यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करावे / विल्हेवाट लावावी लागेल व त्याचा चांगले कुजलेले कंपोस्ट खत बनवून वापर करावा.
Share your comments