शेतकऱ्यांनी पिकांमध्ये बऱ्याच प्रकारची विविधता आणली असून निरनिराळ्या प्रकारची पिके आता शेतकरी घेऊ लागले आहेत. त्यामध्ये बरेच शेतकरी आता फूल शेतीकडे वळत असून अगदी पॉलीहाऊस सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुलशेती यशस्वी करत आहेत. जर आपण फुलशेतीचा विचार केला तर यामध्ये आपण झेंडू आणि गुलाबाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात करतो.
परंतु यामध्ये देखील गुलाब लागवडीकडे शेतकऱ्यांचा फार मोठा कल असून या फुलाची एक जगातील सर्वात सुंदर आणि सुवासिकता यादृष्टीने प्रसिद्धी तसेच मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी गुलाबाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.
म्हणून गुलाब लागवड सध्या व्यवसायिक दृष्टिकोनातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. गुलाब फुल शेती मध्ये खूप बारीक काळजी घेऊन जर नियोजन केले तर नक्कीच त्यातून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळते.
गुलाब लागवड आणि घ्यायची काळजी
मिनिएचर, फ्लोरीबंडा आणि हायब्रीड टी सारख्या गुलाबाच्या जातीय व्यवसायिक उत्पादनासाठी लागवड करणे खूप महत्त्वाचे असून याच्या लागवडीनंतर झाडे सावलीत नीट वाढत नसल्याने आणि ते फुलत देखील व्यवस्थित नाही
त्यामुळे गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी किमान सहा तास प्रखर सूर्यप्रकाश असणे गरजेचे आहे. तसेच पाणी तुंबणार नाही म्हणजेच पाण्याचा निचरा होणारी, मध्यम काळी, हलकी जमीन गुलाब लागवडीला उत्तम ठरते.
जर शेतामध्ये पाणी तुंबत असेल आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसेल तर अशा ठिकाणी गुलाबाच्या झाडाची मुळे कुजतात व झाड मरण्याचा धोका संभवतो.
गुलाबाची अभिवृद्धी डोळे भरून केली जाते. जर आपण रोझा इंडिका किंवा रोझा मल्टीफ्लोरा या जातींचा विचार केला तर या जातींची अभिवृद्धि खुंटावर डोळे भरून केली जाते.
नक्की वाचा:Crop Timing: सप्टेंबरमध्ये करा 'या' भाजीपाला पिकांची लागवड, मिळेल चांगले उत्पादन आणि दर
छाटणीचा कालावधी
जून आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये गुलाबाची छाटणी केली जाते व छाटणी करताना धारदार चाकू आणि कात्री चा वापर महत्त्वाचा ठरतो. छाटणी झाल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. जर आपण एक चांगले व्यवस्थापन करून गुलाबाच्या सरासरी उत्पादन याचा विचार केला तर ते हेक्टरी अडीच ते तीन लाख फुलांपर्यंत असू शकते.
गुलाबाच्या चांगल्या उत्पादनक्षम जाती
ग्लॅडिएटर, सुपरस्टार, पीस हॅपिनेस, मोटेझुमा, आयफेल टॉवर, लाडोरा, क्वीन एलिझाबेथ इत्यादी गुलाबाच्या प्रमुख जाती आहेत.
गुलाब फुलांसाठी भारतातील मार्केट
जर आपण भारतामध्ये फुलांसाठी सर्वोत्तम बाजारपेठेचा विचार केला तर यामध्ये पुणे, मुंबई, नासिक, नागपूर, दिल्ली, जयपुर, कोटा, चेन्नई आणि अहमदाबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्केट आहे.
Share your comments