1. कृषीपीडिया

मातीला हवी जिवाणू संवर्धनाची क्रांती

शेती व मातीचे आरोग्य, जमीन संवर्धन आणि उपजीविकेसाठी जमिनीचा वापर या सर्व मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.जैविक उत्पादकता,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
मातीला हवी जिवाणू संवर्धनाची क्रांती

मातीला हवी जिवाणू संवर्धनाची क्रांती

शेती व मातीचे आरोग्य, जमीन संवर्धन आणि उपजीविकेसाठी जमिनीचा वापर या सर्व मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.जैविक उत्पादकता, आपल्याला लागणारी ऊर्जा, अन्न आणि इतर गरजा जमिनीच्या आरोग्यावर, विशेषतः त्यातील पोषक, पाणी आणि कार्बन समतोल यावर अवलंबून असतात, जे मातीचे मूलभूत स्त्रोत आहेत. पण, आज ते झपाट्याने कमी होत आहे. उत्तम शेती व्यवस्था आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याशिवाय क्रांती अशक्य आहे. सध्या जमिनीची पोषण क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यातील पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी अनेक खनिज पदार्थांवर संशोधन आणि पुरवठा करण्याची गरज आहे. जमिनीची पोषण क्षमता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष जमिनीतच ठेवावे लागणार, तरच जमिनीची पोषण क्षमता टिकून राहते. नापीक जमिनीची क्षमता वाढवण्यासाठी आणि जैविक क्षमता सुधारण्यासाठी आपल्याला पुन्हा योग्य तांत्रिक सल्ला आणि संशोधनाची गरज आहे. याशिवाय खतांचा संतुलित वापर आणि संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यास समर्थन दिले पाहिजे. 

जमिनीचा वापर आणि जमिनीची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आपण स्वतःला सवय लावली पाहिजे शेती विकास कार्यक्रमाचे खरे उद्दिष्ट अपूर्ण राहील.

जैविक विविधतेचा ऱ्हास हा सर्वांसाठीच काळजीचा विषय आहे. जेव्हा आपण शाश्वत विकासासंदर्भात बोलतो, तेव्हा मात्र, जमिनीखालील जैवविविधतेला जास्त महत्त्व दिलं जात नाही. जागतिक स्तरावरील फूड आणि अ‌ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने या वर्षी अहवाल प्रसिद्धी केला आहे. त्यात मातीच्या संवर्धानावर विशेष भर देण्यात आला आहे. जमिनीखाली सुमारे २५ टक्के जैव विविधता समावलेली आहे. तलावावरील ४० टक्के जीवांचा त्यांच्या जीवनचक्रात मातीशी संबंध येतो. विविध प्रकारचे जंतू, जीवाणू, लहान प्राणी, सुक्ष्मजीव मातीत राहतात. पिकांच्या वाढीसाठी त्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे मातीला सुस्थितीत ठेवणे महत्त्वाचे आहे.आता हे च पहा ना मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, दिवसेंदिवस जमिनीची उत्पादकता कमी कमी होत आहे.

याची प्रमुख कारणे म्हणजे जमिनीचा अतिवापर, सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा अयोग्य वापर इत्यादींमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे

जमीन ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. यामध्ये शेतीसाठीची विविध कार्ये केली जातात, जसे कि अन्नद्रव्यांचे चक्रीकरण व साठवणूक, सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांचे सुयोग्य नियंत्रण, जमिनीतील पाणी व विद्राव्य घटकांची वनस्पतीकरिता उपलब्धता, त्याचप्रमाणे शेतीव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी भौतिक माध्यम, कच्चा माल पुरविण्याचे साधन आहे. परंतु, जमीन ही वाढ न होणारी, मर्यादा असलेली नैसर्गिक संपत्ती आहे. सद्य:परिस्थितीत जमिनीची अवनिती हवा व पाण्यामुळे होणारी धूप, जंगलतोड, आम्ल व विम्ल जमिनीच्या क्षेत्रात होत असलेली वाढ या गोष्टींमुळे अतिशय झपाट्याने होत आहे. म्हणून जमीन या नैसर्गिक संपत्तीस सुस्थितीत ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे

जमिनीचा वरचा थर ज्याला आपण माती म्हणतो ते तयार करण्यासाठी निसर्गाला खूप वेळ लागतो. मातीच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून आपण ज्या प्रकारे रासायनिक खते व औषधींचा अनाठायी वापर करत आहोत, मित्रांनो आपन वेळोवेळी माती परीक्षण करून जमिनीचे आरोग्य जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.जमिनीचे आरोग्यही राखले पाहिजे

ज्या प्रक्रियेअंतर्गत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात.  

माती संवर्धनाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे माती तिच्या जागी स्थिर ठेवणे, तिची सुपीकता वाढवणे, खतातील घटकांचे आवश्यक प्रमाण व प्रमाण राखणे आणि दीर्घकाळ उत्पादन चालू ठेवण्यासाठी तिची उत्पादन क्षमता वाढवणे.

 

मिलिंद जि गोदे

Mission agriculture soil information

English Summary: Soil need of microbs conversation practice Published on: 04 February 2022, 05:42 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters