1. कृषीपीडिया

माती आहे मानवी संस्कृतीचे उगमस्थान, एक महत्वपूर्ण विश्लेषण

शेतकरी वर्ग शेती व्यवसायावर अवलंबून आहे. गावातील लोकांची उपजीविका म्हणजे शेती व्यवसाय सर्व शेतीवर अवलंबून आहे.त्यामध्ये बरेचसे शेतीक्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची हमी नसते. मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्ध असल्याने आणि सिंचनाच्या सुविधा मुबलक नसल्याने याच क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the soil

the soil

शेतकरी वर्ग शेती व्यवसायावर अवलंबून आहे. गावातील लोकांची उपजीविका म्हणजे शेती व्यवसाय सर्व शेतीवर अवलंबून आहे.त्यामध्ये बरेचसे शेतीक्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची हमी नसते. मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्ध असल्याने आणि सिंचनाच्या सुविधा मुबलक नसल्याने याच क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.

तुमच्या लक्षात येईल की माती पिकाच्या मुळाला आधार, अन्न पुरवणारी यंत्रणा  म्हणजे जमीन होय. तिचं मूलद्रव्य आणि पाणी पुरवठा करण्याचे काम करत असते. जमिनीला जिवंत करण्याचे काम अहोरात्र कोट्यावधी जिवाणू अभिक्रिया द्वारे मातीच्या जडणघडण याचे काम करतात. म्हणून माती हे सजीव माध्यम आहे. कोट्यावधी सूक्ष्म जिवाणू नी  समृद्ध, पोषक अन्नद्रव्य, हवा आणि पाणी असा सुवर्ण संगम साधलेले माध्यम म्हणजे माती हेच माणूस संस्कृतीच्या विकासाचे उगमस्थान आहे.

म्हणून मातीला आपण काळी आई म्हणून संबोधतो. शेतीसाठी तर मातीचे महत्त्व फारच आहे हे आपणाला माहीत आहे. ज्या मातीत 45 टक्के मातीचे कण, 25 टक्के पाणी, 25 टक्के हवा आणि पाच टक्के सेंद्रिय कर्ब असते ती पिकाच्या वाढीसाठी आदर्श माती! हे प्रमाण जर बिघडले तर मातीचे आरोग्य बिघडले असे समजा. आपल्या पिकाच्या वाढीसाठी 17 अन्नघटक लागतात. यापैकी एक अन्नघटकाची जरी कमतरता भासली तर पिकाच्या वाढीवर आणि पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. सुपीक मातीत सर्वांना घटक पुरेशा प्रमाणात असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्या पिकाला उपलब्ध होतं ते पिके उत्तम अशा स्वरूपाचे असतात.

जमिनीचे आरोग्य कसे बिघडते?

 रासायनिक खत हे पिकाचे अन्न आहे.कमी मात्रेत अधिक अन्नद्रव्ये पिकाला हवे तेव्हा उपलब्ध करतात. जमीन खराब होते रासायनिक खतांचा चुकीच्या पद्धतीने वापर व शिफारसी पेक्षा जास्त वापरामुळे! खऱ्या अर्थाने मातीचे आरोग्य बिघडते ते पाण्याच्या जास्त वापरामुळे. पिकाला पाणी दिल्यानंतर ते पाणी पीक मुळावाटे हवे तेवढे शोषून घेते, बाकीचे जमिनीत साचून राहते. साचलेले पाणी माती मधील हवा बाहेर काढून त्याची जागा घेते. वेळीच पाण्याचा निचरा नाही झाला तर पिकाची मुळे गुदमरतात. झाडाची वाढ खुंटते.साचलेल्या पाण्यात मातीतील क्षार विरघळतात.

सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते मात्र पाण्यातील क्षार जमिनीवर मातीच्या कणात अडकून राहतात. कोणत्याही पिकाला जेव्हा शेतकरी सतत पाणी देतात तेव्हा अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते.क्षार मातीचे कण जोडतात. माती कडक होते. मातीचे रंध्रे बंद होतात.पाणी मुरत नाही.  ओलावा टिकत नाही. परिणामी पिकाची वाढ होत नाही आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणून जास्त पाणी देणे कधीही घातक असते हे लक्षात घेऊन शेती करणे. माती परीक्षण अहवालानुसार खते वापरल्यास मातीचे आरोग्य उत्तम राहीलच आणि उत्पादन सुद्धा वाढणार आहे.

 लेखक..

 मिलिंद जी. गोदे

 युवा शेतकरी मित्र

English Summary: soil is place of origin of human culture precaution of soil is benificial for crop Published on: 12 January 2022, 05:53 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters