त्यानंतर ৭८७० साली ड्यू बेरी ह्याने ऑॅम्पिलोमासयिस भुरी रोगाच्या आत मायसेलियम टाकुन वाढते हे शोधून काढले. १९३२ साली यारवुड ने भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ऑम्पिलोमायसिस चे कोनिडिया असलेले द्रावण फवारले असता, त्यापासुन भुरी रोगाचे नियंत्रण मिळते हे शोधुन काढले.
अम्पिलोमायसिस हि बुरशी, विविध पिकांवरिल भुरी रोगाच्या बुरशीवरच वाढणारी बुरशी आहे. भुरी रोगाच्या बुरशींच्या व्यतिरिक्त ह्या बुरशीसाठी दुसरे अन्न नाही असे अनेक ठिकाणी आढळून आले आहे. ऑम्पिलोमायसिस, भुरी रोगाच्या बुरशीच्या बीजाणू तयार करणाऱ्या सर्वच अवयवांवर हल्ला करते. ज्या ठिकाणी स्पोअर्स तयार होतात त्या कोनिडियोस्पोअर्स, क्लिस्थोशिया तसेच सायनिडिया वर हि बुरशी हल्ला करुन त्यात वाढते.
ऑम्पिलोमायसिस चे बीजाणू (स्पोअर्स) हे 20 ते 30 डि. से. तापमानात आणि मुबलक प्रमाणात पाणी असतांना रुज़तात. वातावरण पोषक असेल तर ऑम्पिलोमायसिस चे बीजाणु २४ तासात रुजतात. ऑम्पिलोमायसिस च्या रुजण्यासाठी सतत १० ते १२ तास जास्त आर्द्रता असणे गरजेचे असते. भुरी रोगाच्या बुरशीच्या आत शिरल्यानंतर हि बुरशी तात्काळ तिचा नायनाट करत नाही, तर कोणताही त्रास न देता भुरी च्या बुरशीच्या आत हि सतत ७ ते १० दिवस वाढत राहते. त्यानंतर ज्यावेळेस अॅम्पिलोमायसिस पुनरुत्पादनाची तयारी करुन सायनिडिया बनवते तेव्हा मात्र २ ते ३ दिवसात भुरी रोगाच्या बुरशीचा नायनाट होतो. ज्यावळेस पावसाचे वातावरण असते त्यावेळेस भुरी रोगाच्या बुरशीच्या आत वाढलेल्या ऑम्पिलोमायसिस बुरशी चे बीजाणू नवीन ठिकाणी वसाहत वसविण्यासाठी तयार असतात, आणि पावसाच्या पाण्याच्या उडण्याने त्यांचे त्यासोबत वहन होते. तसेच भुरी रोगाच्या कोनिडियोफोर्स मध्ये वाढलेल्या अवस्थेत देखिल त्यांच्या सोबत हि बुरशी एका ठिकाणाहनु दुसरी कडे वाहु नेली जाते.
ह्या बुरशीच्या रुजण्याबाबत 1997 साली ग्यु आणि को ह्यांनी जे संशोधन केले ते फार रंजक आहे. ज्यावेळेस ह्या बुरशीचे कोनिडिया (स्पोअर्स) 1 मिली पाण्यात 10^6 पेक्षा जास्त प्रमाणात घेण्यात आले त्यावेळेस ह्या बुरशीचे वातावरण पोषक असून देखिल रुजणे झपाट्याने कमी झाले, जास्त प्रमाणात बुरशीचे स्पोअर्स असलेले द्रावण वापरले असता चांगले नियंत्रण मिळते हे आता पर्यंत आपण जितक्या देखिल बुरशीचा अभ्यास केला त्याबाबतीत दिसून आले आहे, मात्र ह्या बुरशीच्या जास्त प्रमाणातील संख्या असलेल्या स्पोअर्स च्या वापराने त्या स्पोअर्स चे रुजणेच कमी होते, ह्या प्रतिक्रियेस शास्त्रज्ञ सेल्फ इनहिबिशन म्हणजेच स्व नियंत्रण असे म्हणतात.
पानांवर जर भुरी रोगाची लागण झालेली नसेल तर मात्र ह्या बुरशीच्या उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्या कारणाने तिची वाढ होत नाही. त्यामुळेच ज्या पिकाची भुरीच्या प्रती जास्त प्रतिकारक क्षमता असते, अशा पिकावरिल भुरी नियंत्रणासाठी या बुरशीचा फारसा उपयोग होत नाही. ऑॅम्पिलोमायसिस च्या वाढीसाठी पोषक असणारे जास्त आर्द्रता असलेले (90 ते 95 टक्के या पेक्षा जास्त सापेक्ष आ्द्रत) आणि 20 ते 30 डि.से. तापमान असलेले वातावरण हे भुरीसाठी फारसे पोषक ठरत नाही, त्यामुळे देखिल बुरशीच्या वापरावर मर्यादा येतात. भुरी आणि अॅम्पिलोमायसिस ह्यांच्या वाढीसाठी असे परस्पर विरोधी वातावरण गरजेचे असल्या कारणाने देखिल ह्या बुरशीच्या वापरावर मर्यादा येतात.
जगभरातील अनेक प्रयोगात हि ऑम्पिलोमायसिस अनेक पिकांवरिल भुरी रोगाच्या नियंत्रणसाठी कार्यक्षम देखिल ठरलेली आहे. हि बुरशी अनेक प्रकारच्या भुरी रोगांवर हल्ला करते. यात द्राक्ष पिकावरिल भुरी, मिरची, ढोबळी मिरची, वेल वर्गिय भाजीपाला व फळे यावरिल भुरी रोगांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.
ज्यावेळेस भुरी रोगाच्या बुरशीवर हि बुरशी हल्ला करते, त्यानंतर भुरीच्या बुरशीची वाढ ही हलक्या पांढऱ्या रंगाची, करड्या रंगाची आणि सपाट झालेली दिसुन येते. भुरी च्या बुरशीव्दारे नवीन बीजाणू (स्पोअर्स) तयार केले जात नाहीत, आणि पानांवर नविन ठिकाणी भुरीची लागण दिसत नाही. काही वेळेस ज्या ठिकाणी भुरीची बुरशी पानांच्या वरिल थरात वाढते, त्याठिकाणीच्या पानांच्या पेशी देखिल, भुरीची नायनाट झाल्याने मरण पावलेल्या आणि पिवळसर झालेल्या दिसुन येतात. अम्पिलोमायसिस मुळे पानांवरिल भुरी व्दारे नवीन स्पोअर्स तयार करण्याची क्षमता देखिल नष्ट होते. ज्यामुळे नवीन ठिकाणी भुरीची लागण होण्याची शक्यता मावळते. हि बुरशी कोणतेही विषारी जैव रसायन स्रवत नाही, तर सरळ जावुन भुरीच्या आत शिरते आणि तिच्या मायसेलिमय मध्येच वाढते. ज्या प्रमाणे ईतर बुरशी मोठ्या प्रमाणात विषारी जैव रसायने स्रवुन हानीकारक बुरशींचा नायनाट करतात, त्याप्रमाणे ऑम्पिलोमायसिस करत नाही, तर ही बुरशी हानीकारक बुरशीच्या मायसेलियमच्या आतच वाढते. ह्या बुरशीच्या वाढीसाठी आणि तिचा जिवन क्रम पुर्ण करण्यासाठी भुरीच्या बुरशीच्या व्यतिरिक्त ईतर काही स्रोत नसल्या कारणाने भुरी रोगाच्या नियंत्रणात प्रतिबंधकात्मक म्हणुन या बुरशीचा वापर फायदेशीर ठरत नाही.
भुरी रोगाच्या वाढीच्या वेगा पेक्षा जर ऑॅम्पिलोमायसिस ची शक्ती कमी पडली तर मात्र ही बुरशी भुरी रोगाचे चांगले नियंत्रण मिळवु शकत नाही. भुरी रोगाचा वाढीचा वेग हा ऑम्पिलोमारयसिच्या वाढीपेक्षा कमी असेल तरच हि बुरशी चांगले नियंत्रण मिळवुन देवु शकते.
पानांवरिल भुरी फस्त करुन झाली की हि बुरशी पिकाच्या मृत अवशेषांवर सायनिडिया (pycnidia) तयार करुन सुप्तावस्थेत राहते
सरते शेवटी आपण इतकेच म्हणु शकतो की, द्राक्ष, वेल वर्गिय भाजीपाला, मिरची वै. पिकात ह्या बुरशीचा वापर जर भुरी नियंत्रणसाठी करावयाचा असेल तर सापेक्ष आर्द्ता हि 90 ते 95 टक्के ह्या पेक्षा असेल तेव्हा करावा, तापमान 20 ते 30 डि. से. असेल तर करावा, आणि विषेश म्हणजे हे की, पानांवर भुरी नसेल तर वापर करुन फायदा नाही.
Share your comments