भारत एक कृषिप्रधान देश आहे आणि कृषिप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेती हा एक कणा असतो, आपल्या देशाचा देखील शेती एक कणा आहे आणि देशाची अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. असे असले तरी भारतात अद्यापही कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल नमूद करण्यात आलेले नाहीत मात्र काही कृषिभूषण शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देत आधुनिकतेची कास धरीत आहेत. देशात आता अनेक शेतकरी औषधी वनस्पतींची लागवड करून चांगला मोठा नफा कमवत आहेत. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, पारंपारिक पिकासाठी उत्पादन खर्च हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि पारंपरिक पिकातून उत्पन्न मात्र दिवसेंदिवस घटत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता औषधी वनस्पतींची तसेच यासारख्या नगदी पिकांची लागवड करणे अनिवार्य ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशातील शेतकरी बांधवानी औषधी वनस्पतीच्या लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे, अनेक शेतकरी बांधव औषधी वनस्पतींची लागवड करून लाखो रुपयांचा नफा आपल्या पदरात पाडीत आहेत. काही अशा औषधी वनस्पती आहेत ज्याची लागवड करून एका एकरात तब्बल सहा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते, या औषधी वनस्पती पैकी एक आहे शतावरी. आज आपण शतावरी शेती विषयी काही महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेणार आहोत. मित्रांनो शतावरी एक महत्त्वपूर्ण औषधी वनस्पती आहे, या वनस्पतीच्या पानांचा उपयोग आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय या वनस्पतीवर कीटक पतंग यांचा प्रादुर्भाव आढळत नाहीत.
ही औषधी वनस्पती काटेरी असल्याने जनावरांना देखील खायला आवडत नाही. नर्सरी तंत्राने शतावर लागवड केली जाते. रोपवाटिका तयार करण्यापूर्वी शेतात चांगली नांगरणी करावी लागते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक या वनस्पतीच्या लागवडीसाठी सेंद्रिय खत वापरण्याची शिफारस करतात. याशिवाय शेतात पाण्याचा निचरा चांगली झाली पाहिजे अन्यथा पीक निकामी होण्याची शक्यता असते. लागवणीनंतर या झाडाच्या मुळांना परिपक्व होण्यासाठी सुमारे 12 ते 14 महिने लागतात.
एका झाडापासून सुमारे 500 ते 600 ग्रॅम रूट अर्थात मूळ्या मिळू शकतात. एक हेक्टरमधून सरासरी 12 हजार ते 14 हजार किलोग्रॅम ताज्या मुळ्या मिळू शकतात. या मूळ्या सुकवल्यानंतर शेतकऱ्यांना 1 हजार ते 1200 किलो मुळे मिळते. बाजारात विक्री केल्यावर शेतकऱ्यांना एक एकरात 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
Share your comments