सावकारांकडून कर्जे, बँकांकडून मानहानी / अपमान, असे सुरू झाले.
कृषीद्रोही धोरणांमुळे शेतमालाला भाव नाही, निसर्गाचा मारा, वीज तोडणी अशा संकटांच्या मालिका चालु आहे.
महाराष्ट्र बरेच वर्षे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आकडेवारीमध्ये इतर राज्यांच्या किती तरी पुढे पहील्या क्रमांकावर आहे.
त्याची कारणे सांगताना नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी असे दाखवुन दिशाभुल केली जाते. प्रत्यक्षात अनेक कारणांपैकी एक महत्वाचे आहे कर्जाचा बोजा
प्रत्यक्षात अनेक कारणांपैकी एक महत्वाचे आहे कर्जाचा बोजा.
सन 2020 साली देशामध्ये, सर्वाधिक महाराष्ट्रात 4006 आत्महत्या झाल्या. म्हणजे दिवसाला 11 हत्या.पण सरकार कोणतीही प्रतिबंधनात्मक कृती कार्यक्रम आखीत नाही.ह्या विषया शिवाय इतर कुठलाही विषय प्राधान्य क्रमांकाचा होऊच शकत नाही.
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केल्याला, 27 डिसेंबर 2021ला दोन वर्षे पुर्ण होतात. सरसकट कर्जमुक्तीच्या नावाखाली सकुंचित कालखंड, फक्त पीक कर्ज व दोन लाख रू. खालील कर्ज अशा अटी
टाकल्यामूळे लाखो शेतकरी (77%) या योजनेपासून वंचित राहीले आहेत. नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांनाही सानुग्रह / प्रोत्साहनपर मदत दिली नाही.
निवडणुका पुर्वी दिलेली वचननामे, जाहीरनामे, शपथनामे पाळली गेली नाहीत.
अजुन किती दिवस धोंगडं भिजत ठेवणार आहात?
#TargetZero_FarmersSuicides
Share your comments