1. कृषीपीडिया

चंदन शेती आपणांस बनवेल श्रीमंत! जाणून घ्या 'या' शेती संबंधी महत्वाची माहिती.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
sandelwood trees

sandelwood trees

भारतात फळ आणि भाजीपाला पिकांची लागवड करून शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवतात पण ह्या शेतीव्यतिरिक्त देखील अशी एक शेती आहे जी शेतकऱ्यांना करोडपती बनवून देऊ शकते आणि ती शेती म्हणजे चंदनची शेती. चंदन लागवडीतून एवढे उत्पन्न मिळते की शेतकरी कमी कालावधीत जास्तीचे उत्पन्न प्राप्त करून करोडपती बनू शकतात. परंतु यासाठी शेतकऱ्यांकडे चंदन शेती संबंधी पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे.

आपल्याला माहीतच आहे की चंदनाचे लाकूड हे जगातील महागातील लाकडापैकी एक आहे, एवढेच नाही तर सरकार दरवर्षी चंदनचा भाव पण वाढवून देते. सध्या चंदनची पावडर 30000 रु. प्रति किलो च्या दराने विकले जात आहे.

 

चंदनाचे झाड विकसित होण्यासाठी किती कालावधी लागतो

चंदनाचे रोपट्याला एक झाड बनायला कमीत कमी 12 ते 15 वर्ष लागतात. 12 वर्षात चंदनाचे वजन जवळपास 15 किलोच्या आसपास भरते आणि 15 वर्षाचे होईपर्यंत याचे वजन जवळपास 20 किलोच्या घरात पोहचते. मित्रांनो लक्षात घ्या हे झाडाचे वजन नाही, ते पावडरचे वजन आहे जे चंदनापासून बाहेर काढून विकले जाते.

हरियाणातील चंदन फार्मच्या ऑपरेटरने सांगितले की तो लोकांना दोन वर्षांचे चंदनाचे रोप देतो. यानंतर, शेतकऱ्यांना चंदन लागवड करून 12 वर्षे चंदनाच्या झाडाची काळजी घ्यावी लागते. मग, झाडापासून सुमारे 18-19 किलो वजनाची पावडर आपल्याला मिळते. ह्या ऑपरेटरच्या शेतात पांढरी चंदनाची झाडे लावली आहेत.

 परपोशी आहे चंदनाचे झाड

चंदन एक परजीवी वनस्पती आहे, परजीवी असे त्यांना म्हणतात जे इतर सजीवांवर पोषणासाठी अवलंबुन राहतात आणि त्यांच्याकडून अन्न घेतात. त्याचप्रमाणे चंदनाचे झाड इतर झाडांच्या मुळांपासून आपले अन्न घेते.  म्हणून, हे झाड एकटे शेतात लावू नये, अन्यथा त्याची झाडे मरतील.

चंदन शेतीसाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे तसेच चंदनासाठी उपयुक्त जमीन कोणती?

ज्या ठिकाणी पाण्याचे पीएच मूल्य साडेसहाच्या वर आहे त्या ठिकाणी पांढऱ्या चंदनाची लागवड करता येते. ज्या ठिकाणी पाण्याचे पीएच मूल्य साडेसहा पेक्षा कमी आहे त्या ठिकाणी लाल चंदनाची लागवड केली जाते. चंदनाची लागवड करणारे शेतकरी, असे सांगतात की, शेतकरी अशा ठिकाणी पांढऱ्या चंदनाची लागवड करू शकता जिथले पाणी प्यायल्यावर आपले पोट खराब होत नाही.  चिकण माती असलेल्या जमिनीमध्ये चंदनाची लागवड यशस्वीरित्या केली जाते. तसेच चंदनची लागवड लाल माती असलेल्या जमिनीत आणि इतर शेतीयोग्य जमिनीत देखील करता येते, परंतु आपण रेताड जमिनीत चंदन लागवड करणे शक्यतो टाळावे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी चंदनाची लागवड केली जाणार आहे तिथे पाणी साचता कामा नये. अन्यथा झाडे खराब होऊ लागतील. झाडांच्या चांगल्या वाढीसाठी गांडूळ खत दर तीन ते चार महिन्यांनी झाडांना लावावे. आपण चंदनाला फवारणी देखील करू शकता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शेतीसाठी कोणाची हवी परवानगी?

चंदन लागवड करणाऱ्या शेतकरीने चंदन शेतीसाठी लागणाऱ्या परवानगी बद्दल माहिती दिली, ते म्हणाले की 2017 पूर्वी असा नियम होता की चंदनाची लागवड करण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घ्यावी लागायची. पण आता तसे नाही. आता तुम्ही चंदनाची सहजगत्या लागवड करू शकता. यानंतर, तुमच्या तलाठ्याला ही माहिती द्यावी लागते, तसेच Divisional Forest Officer कडे अर्ज करावा लागतो.

 

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters