भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु तरीही भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हवी तेवढी देत नाही. वार्षिक उत्पन्न कमी होण्याच्या कारणामुळे कर्ज दिवसेंदिवस वाढतच जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार कडून देखील अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.
परंतु वेगळ्या पिकांचे लागवड करून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. यामध्येच एक म्हणजे साग वृक्षाची लागवड ही होय. सागाचे लाकूड बाजारांमध्ये खूप महाग मिळते. त्यामुळे जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये सागाचे लागवड केली तर काही वर्षानंतर कोटी रुपयांमध्ये उत्पन्न मिळू शकते. या लेखात आपण साग लागवड विषयी माहिती घेऊ.
वर्षात केव्हा करावी सागाची लागवड?
सागाची लागवड संपूर्ण भारतात कुठेही करता येऊ शकते. साग लागवडीसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे महिने योग्य आहेत. तसे पाहायला वर्षभरात सागाचे झाड कोणत्या ठिकाणी लागवड करून उगवले जाऊ शकते. तज्ञांच्या मते, साग वृक्षाची लागवड करण्यासाठी मातीचा सामू हा 6.50 ते 7.50 त्यामध्ये असणे फायदेशीर ठरते. जर अशा प्रकारच्या सामू असलेल्या मातीत साग वृक्षाची लागवड केली तर झाडाची वाढ जलद होते.
साग लागवडीनंतर करायची कामे
जसे इतर पिकांसाठी असते तसेच सागाच्या शेतीसाठी सुद्धा देखभाल करणे गरजेचे आहे. काही वर्षांपर्यंत या वृक्षाची व्यवस्थितरीत्या देखरेख करावी लागते. साग लागवडीनंतर अगोदरच्या तीन ते चार वर्षांपर्यंत सागर वृक्षां कडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे. जर सुरुवातीला तुम्ही व्यवस्थित रित्या नियोजन केले तर भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. लागवडीनंतर च्या पहिल्या वर्षात व्यवस्थितरीत्या वर्षातून दोन ते चार वेळा अंतर मशागत तसेच पाणी आणि खते योग्य रीतीने देणे गरजेचे असते. साग वृक्षाला गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नये नाहीतर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते व त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.
किती वर्षात तयार होते साग वृक्?
सागाची एकदा लागवड केल्यानंतर कमीत कमी दहा ते बारा वर्ष उत्पादनासाठी वाट पाहावी लागते. तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर देखील सागाचे लागवड करू शकता व शेतामध्ये अन्य पिके घेऊ शकतात.
सागाच्या झाडाला जनावरांपासून देखील धोका नसतो कारण सागाचे पाने हे कडवट असतात
सागशेतीमधून मिळेल बंपर कमाई मिळूशकतो कोटीत नफा
प्रत्येक शेतकऱ्यांची इच्छा असते की त्यांना शेतीमधून चांगले उत्पन्न मिळावे. सागर शेतीमध्ये नियोजनात्मक कष्ट आणि काही वर्षांपर्यंत थांबण्याची तयारी असावी लागते. जर तुम्ही एका एकर शेतीमध्ये पाचशे सागाच्या झाडांची लागवड केली दहा ते बारा वर्षात हे तुम्ही एका कोटीच्या आसपास विकू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही साग वृक्षाच्या लागवडीतून बंपर कमाई करू शकता.सागाच्या लाकडाच्या किमतीचा विचार केला तर तीस ते चाळीस हजार रुपयांमध्ये सहजतेने विकले जाऊ शकते. जसजशी जास्त वेळ जाते तसतशी किमतीतही वाढ होते. त्यामुळे दीर्घकालीन थांबण्याची तयारी असेल तर चांगला नफा मिळू शकतो.
Share your comments