रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर सिंचनाखाली उन्हाळी मूग व उडीद लागवड नक्कीच फायदेशीर ठरेल. मूग आणि उडीद ही 70 ते 80 दिवसामध्ये येणारी पिके असून, अल्प उपलब्ध पाण्यामध्ये या पिकाचे उत्पादन घेता येते.
1) जमीन :
मध्यम ते भारी चांगला निचरा होणारी असावी.
2) पूर्वमशागत :
रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर वखराच्या साह्याने जमीन भुसभुशीत करावी.कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. एकरी पाच टन गाड्या कुजलेले शेणखत टाकावे.
नक्की वाचा:शेतकरी व संकल्पनेचा गुढीपाडवा एकदा वाचाच महत्वाचा लेख
3) पेरणीची वेळ :
उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारी अखेर ते मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करावी. दोन ओळींमधील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांमधील अंतर दहा सेंमी असावे.पेरणी केल्यानंतर सिंचनासाठी चार ते पाच मीटर रुंदीचे सारे ओढून घ्यावेत.
4) सुधारित वाण :
1) मुग : वैभव, पी. डी. एम.-1, पुसा 9531 किंवा पुसा वैशाखी
2) उडीद : टी -9 किंवा पी. डी. यु.-1
5) बियाणे प्रमाण :
15 ते 20 किलो प्रति हेक्टर
6) बीजप्रक्रिया :
मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा भुकटी लावावी.त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून बियाण्यावर लावावी. सावलीमध्ये वाळल्यानंतर पेरणी करावी. रायझोबियम मुळे मुळांवरील गाठींची प्रमाण वाढून नत्राची उपलब्धता वाढते.
नक्की वाचा:मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मरण अटळ; शेतकऱ्यांना ज्याची भीती होती तेच झाले
7) पेरणी :
पेरणीपूर्वी पाणी देऊन रान वाफशावर आल्यानंतर पेरणी करावी.
8) खत माता :
या पिकांना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतात सोबत मिसळून बियाणे जवळ पेरणी केल्यास पिकाच्या वाढीस लाभ होतो.
9) आंतर मशागत :
पिकांच्या पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांत पहिली कोळपणी करावी. पहिल्या कोळपणी नंतर दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. कोळपणी नंतर खुरपणी करून रोप तणविरहित ठेवावे. तिचे सुरूवातीची 40 ते 45 दिवस तन विरहित ठेवल्यास उत्पादनवाढीस फायदा होतो.
10) पाणी व्यवस्थापन :
पेरणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली पाण्याची पाळी द्यावी.पिकाच्या संपूर्ण कालावधीत एकूण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात. पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा तयार होताना पाण्याचा ताण पडणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.
11) पिक संरक्षण :
उन्हाळ्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो. किडीमध्ये मावा, तुडतुडे, भुंगेरे पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव असतो. तसेच भुरी व पिवळा विषाणू या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो.
नक्की वाचा:शेतकरी बांधवानो गव्हाची विक्री की साठवणूक; जाणुन घ्या बाजारातील चित्र
12) काढणी :
मुगाच्या शेंगा 75% वाळल्यानंतर पहिली तोडणी करावी त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा वाळल्यानंतर मळणी करावी.
उडदाची कापणी करून खळ्यावर आणून त्याची मळणी करावी. उडदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही.
साठवणी पूर्वी मूग उडीद धान्य चार ते पाच दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यावे. ते पोत्यात किंवा कोठीत साठवताना कडुलिंबाचा पाला धान्यात मिसळावा. साठवणीतील किडीपासून बचाव होतो.
13) उत्पादन :
मूड उडदाचे जातीपरत्वे आठ ते दहा क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकते.
Share your comments