कपाशीवरील कीड आणि रोगांचा विचार केला तर कपाशीमध्ये बोंड आळी आणि कपाशीची बोंडे सडणे हे दोन प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे नुकसान जास्त होते.बोंड सडी मध्ये बऱ्याचदा कपाशीची बोंडे बाहेरून निरोगी दिसतात परंतु मधून ती जर फोडून बघितली तर आतून ती गुलाबी आणि पिवळसर लाल रंगाचेहोऊन सडलेली दिसतात
ही समस्या आता बर्याचप्रमाणात कपाशी पिकात दिसत आहे. या लेखात आपण बोंड सडण्याचे प्रकार व कारणे तसेच उपायोजना जाणून घेऊ.
कपाशीचे बोंड सडण्याचे दोन प्रकार
- आंतरिक बोंड सडणे- ही समस्या प्रामुख्याने संधीसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत जिवंत राहणारे व तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात आंतर वनस्पती रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होते.या प्रकारात कपाशीची बोंडे बाहेरून निरोगी दिसतात परंतु फोडली असता मधील कापूस पिवळसर गुलाबी ते लाल तपकिरी रंगाचा होऊन सडलेला दिसतो. तसेच बोंडावर पाकळ्या चिकटल्याने बोंडा च्या बाहेरील भागावर ओलसरपणा राहतो अशा ठिकाणी जिवाणूजन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.
- बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग – यामध्ये काही रोगकारक बुरशीं, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोडांवरील जिवाणू करपा कारणीभूत असतो. त्यामध्ये बोंडे परिपक्व आणि उमलण्याच्या अवस्थेत असे प्रकार आढळून येतात.बहुतेक वेळा बोन्डावर बुरशीची वाढ झाल्याचे दिसते.
उपाययोजना
- बोंडांना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच इतर नुकसानदायक बुरशीचीवाढ होणार नाही.
- कपाशी पात्या,फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रसशोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवून वेळीच उपाय योजना कराव्यात.
- पात्याफुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततच्या ढगाळ वातावरण, हवेतील आद्रता व रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडरोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ( 50% डब्ल्यू पी) 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारणी करावी.
- बोंडांच्या पृष्ठ भागावर होणारा बुरशींचा संसर्ग रोखण्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
मेटीराम (50 टक्के) अधिक पायराक्लोस्ट्राबीन (पाच टक्के डब्ल्यू जी) ( संयुक्त बुरशीनाशक) दोन ग्रॅम किंवा प्रोपिकॉनाझोल ( 25 टक्केईसी ) एक मिली किंवा ॲझोक्सिस्ट्राबीन (18.2 टक्के डब्ल्यू/ डब्ल्यू) अधिक डायफेनोकोनॅझोल (11.4 टक्के एस.सी.)( संयुक्त बुरशीनाशक) 1 मिली
Share your comments