जालना : राज्यातील शेतकरी अनेक संकटांना तोंड देत असतानाही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोगजालना जिल्ह्यातील शेतकरी एकनाथ मुळे यांनी केला आहे. आपणास जांभळ्या रंगाची जांभळं माहीत आहेत. मात्र, एकनाथ मुळे यांनी आपल्या शेतात चक्क पांढऱ्या रंगाची जांभळं पिकवले आहेत. एकनाथ यांचा हा प्रयोग यशस्वी देखील झाला आहे.
कसं केलं नियोजन?
शेतकरी एकनाथ मुळे यांचे गाव जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव आहे. एकनाथ मुळे यांच्याकडे 25 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. यामध्ये ते वेगवेगळे प्रयोग करत असतात. इंटरनेटवर सर्च करुन त्यांनी पांढऱ्या रंगाच्या जांभळा विषयी माहिती मिळवली.
यांनतर या रोपांची पश्चिम बंगाल राज्यातून खरेदी केली. 300 रुपये प्रति रोप प्रमाणे त्यांनी 200 रोपे खरेदी करून 2019 मध्ये एक एकर क्षेत्रावर 12 बाय 10 फुटावर त्याची लागवड केली. या जांभळाचे संगोपन करण्यासाठी कोणतेही रासायनिक खते, कीटकनाशके वापरली जात नाहीत.
शेतमाल तारण कर्ज योजना; शेतकऱ्यांना ठरतेय वरदान
तीन ते चार लाखांचे उत्पन्न
सध्या एकनाथ मुळे यांच्या शेतमधील जांभळाची झाडे तीन वर्षांची झाली असून झाडांना मोठ्या प्रमाणावर जांभळे लागली आहेत. प्रत्येक झाडावर 12 ते 15 किलोच्या आसपास माल आहे. येत्या आठ ते दहा दिवसात या फळ तोडणी सुरू होईल. बाजारात या जांभळांना 200 ते 400 रुपये प्रतिकीलो एव्हढा दर मिळतो. एक एकर क्षेत्रात या वर्षी तीन ते चार लाखांचे उत्पन्न होईल, असं एकनाथ मुळे यांनी सांगितले.
आनंदाची बातमी! अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू; कर्जमर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवली
Share your comments