1. कृषीपीडिया

फक्त ४ दिवस बाकी! भातशेती करता आली नाही, नो टेन्शन; मिळतायेत 7000 हजार, करा अर्ज

Subsidy on Paddy Cultivation: देशात सध्या मान्सूनचा पाऊस सुरु आहे. मात्र यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी संकटाचा ठरला आहे. खरीप हंगाम सुरु झाला असला तरी काही शेतकऱ्यांना पिकांची अजूनही पेरणी करता आलेली नाही. पाऊस लांबल्यामुळे शेती कामे रखडली आहेत. तर काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत.

paddy

paddy

Subsidy on Paddy Cultivation: देशात सध्या मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain) सुरु आहे. मात्र यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी (Farmers) संकटाचा ठरला आहे. खरीप हंगाम (Kharif season) सुरु झाला असला तरी काही शेतकऱ्यांना पिकांची अजूनही पेरणी करता आलेली नाही. पाऊस लांबल्यामुळे शेती कामे रखडली आहेत. तर काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत.

या खरीप हंगाम 2022 मध्ये येथील अनेक शेतकरी भातशेती (Rice farming) करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्यांचे निराकरण करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला

हरियाणा राज्यात ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही कारणाने भाताची लागवड केली नाही आणि शेतं रिकामी पडली आहेत, अशा शेतकऱ्यांना पर्यायी पिके किंवा फळबागांची लागवड करण्याचा सल्ला दिला जात आहे, ज्यासाठी हरियाणा सरकार 7,000 रुपयांचे आर्थिक अनुदान देईल. हा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना पीक विविधीकरण योजनेअंतर्गत दिला जाईल.

7th Pay Commission: खुशखबर! या महिन्यात वाढणार महागाई भत्ता! सरकारने घेतला मोठा निर्णय

याआधी, हरियाणा राज्य सरकारने शेतकऱ्यांना मक्याची लागवड करणे अशक्य झाल्यास त्यांना 4,000 रुपये प्रति एकर दराने आर्थिक मदत दिली होती. याशिवाय थेट भातशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी ३ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना फारसा त्रास होऊ नये आणि अनुदानाच्या मदतीने पर्यायी पिके घेता येतील, हा या ऐतिहासिक निर्णयांचा उद्देश आहे. या उपायामुळे राज्यातील खालावत चाललेली भूजल पातळी गाठण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही कमी करता येईल.

शेतकऱ्यांना वृद्धपकाळात ही योजना बनणार आधार! मिळणार ३६ हजार रुपये; असा करा अर्ज...

येथे अर्ज करा

पीक विविधीकरण योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी, हरियाणा सरकारच्या 'मेरी फसल मेरा ब्योरा' या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत 7 हजार रुपयांचे अनुदान घेण्यासाठी यापूर्वी 31 जुलै ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती.

मात्र शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन अर्जाची तारीख 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज केल्यानंतर, कृषी विभाग (हरियाणा कृषी विभाग) पुष्टीकरणासाठी तपास करेल, त्यानंतर मदतीची रक्कम गरजू शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो सावधान! भाजीपाला काढणीच्या वेळी करू नका या चुका अन्यथा होईल मोठे नुकसान
नोकरी करत लाखो कमवायचेत? फक्त 15 मिनिटे देऊन करा हा व्यवसाय, व्हाल मालामाल

English Summary: Rice cultivation could not be done, no tension Published on: 06 August 2022, 04:32 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters