चांगला पाऊस पडेल असा अंदाज यावेळी हवामान विभागाने वर्तवला होता. मागच्या 3 दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र पुन्हा एकदा उघडीप घेतली.
कमी दाबाचे क्षेत्र,येत्या ४८ तासात उत्तर/उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता. त्या मुळे येत्या 4,5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज IMD ने वर्तवली आहे.
४,५ दिवशी कोकणात जास्त प्रभाव,मुंबई ठाणे पालघर.
राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पुढचे 4 ते 5 दिवस अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र,येत्या ४८ तासात उत्तर/उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता. त्या मुळे येत्या 4,5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज IMD ने वर्तवली आहे.
४,५ दिवशी कोकणात जास्त प्रभाव,मुंबई ठाणे पालघर.
पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
के एस होसाळीकर यांनी ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार येत्या ४८ तासात उत्तर/ उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवली आहे. ४ ते ५ दिवसांत कोकणात पावसाचा जास्त प्रभाव राहिल. कोकण आणि मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.
स्रोत - हवामान अंदाज
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments