आज शेतकरी या नात्याने विचार मांडत आहे.आपन शेतकरी म्हणून काम करतो पण नविन व आधुनिक पिढीला हा शेतकरी वेगळ्या ग्रहावरचा व दुय्यम असा वाटतो थोडं फार समजून घेऊशेती व शेतकरी म्हटले तर आपल्याला वेगळ्या नजरेने बघत असतात. आपन फक्त वर्तमान पत्राच्या कागदावरचा बळीराजा हे विधान बरोबर आहे का ?मला हेच समजत नाही की शेतकरी हा राजा आहे नजरे तुन आहे!आता हेच बघा जय जवान जय किसान हा नारा आहे शेतकऱ्यांना गौरविण्यासाठीच बाकी आहे त्या नंतर त्याच काही देणंघेणं च नाही.शेतकरी मात्र शेतीमधे राबराब राबतो पण त्या शेतकऱ्यांच्या जीवनात अडचणी मात्र आहे तेथेच आहे त्या अडचणींचा विचार कोणी च आजपर्यंत केला नाही व कोण करणारं सुद्धा नाही आपण तरी विचार करत तो का या गोष्टी चा? नाही कारण आपल्याला शेती करताना येणाऱ्या अडचणीचा गाजावाजा करतंच नाही.हा शेतकरी एका दाण्याचे हजार दाणे करणारा व पिकवणारा,
सुजलाम- सुफलाम धरतीला बनवणारा हा एकमेव मात्र स्वतःच्या पोटाची व परीवार ची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राब राब राबतो साहेब. केव्हा परीस्थिती असी निर्माण होते की दोन वेळचं पोटभर अन्नही नीट त्याच्या वाट्याला येत नाही.मला शेतकरी या नात्याने हेच सांगायचे आहे आरामदेह जीवन हीआम्ही जगू च शकत नाही.कधीकधी आम्हाला बैलांची उपमा उच्च वर्गातील लोक देतात.त्याना ही बरं वाटतं असेल तर त्या मधेही समाधानी आहोत.आज ची परिस्थिती आमच्या उत्पादनाला मिळेल तो दर आम्ही स्विकार तो परंतु या सर्व उत्पन्नावरील नफ्याला चां मालक व्यापारी वर्ग या गोरगरीब शेतकऱ्याला पिळत व नाचवत असतो.ऐवढीमोठी मेहनत करून सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना काहीच मोल राहत नाही असा हा शेतकरीवर्ग एकदम खचलेला व निराश निराधार असतो.
आयत्या पिठावर रेघोट्या मारणारा व्यापारी वर्ग काडीमात्र मेहनत न करताही पैसा हिसकावत असतो. आपला शेती माल कमी दराने विकत घेऊन आपल्याला फसवित असतो. त्यामुळे शेतीच्या कष्टाला व मेहनतीला कवडीची किंमत राहिली नाही.
अनेक सवलती देण्याचे आश्वासन दीले परतु शेतामधेही तेच भर पिकात सरकारने विज कनेक्शन कापले होते व हेच पिळवणूक म्हणजे रात्री ला विजपुरवठा करणे असे सुद्धा असूनही शेतकरी आज त्याच परिस्थितीत बाहेर कसा पडेल हा यज्ञ प्रश्न उभा राहिला आहे. आपल्याला माहीत असेल व सांगायलाही नवं नाही की कर्जा ला कंटाळून आत्महत्या करू लागला कारण शेती करण्याच्या जुन्या पद्धती, पारंपरिक चालत आलेल्या पद्धती यांमुळे या गोष्टीत जास्त नफा मिळत नसल्याने कर्ज भरणे परवडणारी नाही.आपल्या शेतीपासून जास्त उत्पादन घेण्यासाठी चांगले दर्जेदार बियाणे, खते,आणि शेतीचे नियोजनाची आवश्यकता असते. त्या मधे एकमेकांना सहकार्याचा अभाव, तसेच पिकं उभं करण्यासाठी पैसा कमी पडतो त्यामुळे कर्जाच्या दलदलीत शेतकरी फसत आहे.
आता हेच पहा गावा कडेला चला व शेती करा या गोष्टी चा प्रचार व प्रसार चालु आहे.ज्या वेळेस नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्याला जेव्हा सामोरे जावे लागते तेव्हा त्याला व देवा ला च माहीत असते. शहरातील लोकांना असं वाटतं की आपन शेती करावी व शेतकरी व्हाव असे त्या लोकांना वाटते. शेती हि विषय असा आहे की थेअरी व प्रेक्टिकल मधे खुप फरक असतो राव! पुस्तकामधे ज्ञान हे तेवढ्यापुरते मर्यादित असते.आता हे सर्व जाऊ द्या! आपन सर्वांनी चांगलीच गोष्ट शिकण्याची गरज आहे ते म्हणजे आपल्या या शेतकरी बांधव यांचे जीवन समृद्ध आणि संपन्न होण्यासाठी आपण सर्वांनीच शेती ला अंतःकरणापासून प्रेम करण्याची गरज निर्माण केली पाहिजे. आपल्या या शेतकर्याचे सुख दुःख समजावून घेतले पाहिजे. शेतकरी सुखी तर आपन सुखी या सर्व शेतकरी प्रमाने आपणही ही मातीला हीरवा शालु परीधान करून तीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
Share your comments