1. कृषीपीडिया

वाचा कपाशी वर येणाऱ्या बोंडअळ्यांचे विविध प्रकार

कापूस पिकावर मुख्यत्वे 16 प्रकारच्या किडी आढळून येतात.त्यापैकी 3 प्रकार हे बोंडअळीचेच आहेत. तर कोणकोणत्या प्रकारच्या बोंडअळ्या कापसावर येतात त्या ओळखाव्या कश्या आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याचा आढावा घेऊयात

KJ Maharashtra
KJ Maharashtra
वाचा कपाशी वर येणाऱ्या बोंडअळ्यांचे विविध प्रकार

वाचा कपाशी वर येणाऱ्या बोंडअळ्यांचे विविध प्रकार

घाटेअळी/कॉटन बॉल वर्म(Helicovorpa armigera

 

 कापसातील हिरवी बोंडअळी म्हणजेच हरभऱ्यातील घाटेअळी आणि तूर तसेच सोयाबिनातील शेंगा पोखरणारी अळी होय. लागवडीनंतर 75 ते 110 दिवसापर्यंत दिसून येतात.

 

 जीवनचक्र:-

ही कीड पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या अवस्थेतून आपले जीवनचक्र पूर्ण करते.एक मादी पतंग एका वेळी 250 ते 300 अंडी देते यातील अळी अवस्था पिकास नुकसान करते.एक ते दीड महिन्यात जीवनचक्र पूर्ण होते आणि एका वर्षात 10 ते 12 पिढ्या जन्माला येत येतात आणि कापूस सोडून बाकीच्या पिकावर सुद्धा उपजीविका करत असल्याने या किडीवर नियंत्रण मिळवणे खुप कठीण होतेय.

इतर पिके:- सोयाबीन,तूर,भेंडी,मिरची,तंबाखू,भुईमूग,टोमॅटो,मक्का,

ज्वारी आणि इतर 80 पिके

 

ओळखावे कसे? 

किडीचा पतंग दुधी पांढऱ्या व थोडा राखाडी रंगाचा असतो.

अळी पूर्ण हिरवी असते,कधीकधी वातावरणातील बदलांमुळे हिरवट ते राखाडी रंगाची होऊ शकते. 

कोष चॉकलेटी तपकिरी रंगाचा असतो.

 

 नुकसानप्रकार:- 

अळी बोंडास खात खात आत शिरते.अळीचे तोंड आतमध्ये आणि बाकीचे शरीर बाहेर दिसते.

 बोंडावर अळीची विष्ठा पडलेली दिसते.

अळी सरासरी 30 ते 40 बोंडे खराब करून टाकते.

 

आर्थिक नुकसान संकेत पातळी:-

एक अळी किंवा अंडे/प्रति झाड

गुलाबी बोंडअळी/Pectinophora gossypiella

 

कपाशीवरील बोंडअळ्यामध्ये सर्वात धोकादायक अळी म्हणजे गुलाबी बोंडअळी. या व घाटेअळीसाठी बिटी काँटन संशोधित करण्यात आला होता.लागवडीनंतर 30 ते 65 दिवसांपर्यंत पिकावर येतात.

 

जीवनचक्र:-

इतर किडीप्रमाणे ही कीड पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या अवस्थामधून आपले जीवनचक्र पूर्ण करतो.25 ते 35 दिवसात या किडीची जीवनसाखळी पूर्ण होते एका वर्षात अळीच्या 8 ते 12 पिढ्या जन्माला येतात.

 

 ओळखावे कसे?:-

ही अळी शेंदरी गुलाबी रंगाची दिसते त्यामुळेच या किडीचे नाव गुलाबी बोंडअळी असे पडले.

अळीचा पतंग राखाडी दुधी पांढरट रंगाचा असतो.

अळी साधारण 18 ते 19 मिमी इतक्या लांबीची असू शकते.

अळीच्या डोक्याजवळील भाग काळपट रंगाचा दिसतो.

 

 नुकसानप्रकार:- 

बोंडे फुटल्या सारखी दिसतात.

अळी बोंडे आतमध्ये खात जाते,मागील बाजूस विष्ठा सोडते.

बोंडे पोखरलेल्यासारखी व सडल्यासारखी दिसून येतात.

 

आर्थिक नुकसान संकेत पातळी

प्रतिझाड 10% बोंडे खराब दिसणे.

 

ठिपक्यांची बोंडअळी/Earias vittella

लागवडी नंतर 30दिवसापासून ते 65 दिवसांपर्यंत या बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

 

 जीवनचक्र:-

 इतर किडीप्रमाणे या देखील किडीचे जीवनचक्र पतंग-अंडी -अळी-कोष आणि पुन्हा पतंग असे पूर्ण होते.20 ते 25 दिवसात या किडीचे जीवनचक्र पूर्ण होते. मादी पतंग 350 ते 400 अंडी देतो. त्यामुळे ही कीड झपाट्याने वाढते.  

ओळखावे कसे?:-

अळी काळपट तपकिरी रंगाची असते तसेच मधून हिरवट,थोडे पांढरे ठिपके दिसतात.अळी दिसायला घाणेरडी दिसते.

पतंग दिसायला हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचा असतो त्यामुळे पानावरील पतंग पटकन ओळखून येत नाही.

 

नुकसानप्रकार:-

नवजात अळ्या कळी पोखरण्यास सुरवात करतात.शेंडे आणि कोवळा भाग खाऊन शेंडा आतल्या बाजूने पोखरतात.बोंडे लागल्यानंतर अळी पोखरलायला चालू करते आणि बाहेर विष्ठा सोडते.

 

 

 बोंडअळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन:-

पारंपरिक पद्धती:-

1)सलग कापसाची किंवा भेंडी पिकाची लागवड करणे टाळावे.पिकाची फेरपालटणी करावी.

2)मिश्रपीक पद्धती अवलंबवावी कापसासोबत उडीद,सोयाबीन किंवा ज्वारी ही आंतरपिके घ्यावीत.

3)बीज प्रक्रिया - इमिडॅक्लोप्रिड ७० डब्ल्यू. एस. ९ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान २५ डी. एस. ६० ग्रॅम / किलो बियाण्यास चोळावे.  

4)बीटी कपाशी भोवती ५% बिगर बीटी वाणाची लागवड करावी.

5)शेत तणमुक्त ठेवावे,त्यासोबत किडीच्या विविध अवस्था अंडीपुंज,अळ्या दिसताच नष्ट करावेत.

6)नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा.

7)एकरी 15 ते 20 पक्षी थांबे उभे करावेत.

 

 जैविक पद्धती:-

1)7 व्या आणि 12व्या आठवड्यात NPV विषाणूची फवारणी करावी.

2)ट्रायकोग्रामा या मित्रकीटकाची 15 दिवसाच्या अंतराने एकरी 1 ते 1.5 लाख अंडी सोडावीत. एका कार्ड वर 20 हजार अंडी असतात.

3)बिटी कुरस्टाकी 1 किलो/हेक्टरी फवारणी.

4)5%निम तेलाची सुरवातीस फवारणी करावी.

 

 यांत्रिक पद्धती:-

1.सुरवातीपासून एकरी 10 ते 15 हिरव्या बोंडअळी अळीसाठी कामगंध सापळे लावावेत.त्यानंतर पुढील महिन्यात गुलाबी बोंडअळीसाठी सापळे लावावेत.

 

 रासायनिक नियंत्रण:-

लॅम्बाडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. ८ मिली 

स्पिनोसॅड ४५ एस.स

 

संकलन - IPM school

English Summary: Read the different types of bollworms that grow on cotton Published on: 06 October 2021, 08:30 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters