सेंद्रिय शेतीला फायदेकारक ठरणारी आदाने

08 July 2020 06:49 PM

महाराष्ट्र राज्यामध्ये सन १९८० पूर्वी राज्यातील बहुतेक गावा-गावात एकत्र कुटुंबे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होती.  त्यावेळी दळणवळण व्यवस्था फार चांगली नव्हती , शिक्षणाची सुविधा नव्हत्या.   त्यामुळे शेतकरी स्वतःच्या कुटुंबाला आवश्यक असणारे सर्व प्रकारचे तृणधान्य ,कडधान्य, तेलबिया,  फळभाज्या, पालेभाज्या ,फळपिके तसेच पशुधनाला लागणारा वर्षभर पुरेल या पद्धतीने हिरवा चारा, कोरडा चारा कोणतेही रासायनिक खत न घालता कोणत्याही प्रकारची  कीटकनाशके,  तणनाशके पिकावर फवारणी न करता पिकवत असे.

भारतामध्ये १९६६  मध्ये हरित क्रांतीचा पाया रोवला गेला त्यामध्ये प्रामुख्याने नवीन संकरित बियाणे, रासायनिक खते,  रासायनिक कीडनाशके आणि यांत्रिक उपकरणे यावर भर देण्यात आला.  परिणामी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर शेतीमध्ये वाढला.  शेतकरी १०० % कीड मारण्याचा प्रयत्न करतात कीटकनाशकांच्या फवारण्यामुळे काही  दुष्परिणाम झाले आहेत.

१)  हवा जमीन आणि पाण्याचे प्रदूषण झाले.

२) किडींची  कीटकनाशक प्रतिकारकता पिढ्यानपिढ्या वाढू लागली.

३)कीड नियंत्रणावर जादा खर्च होऊन शेतीतील नफा कमी झाला.

४) परागीकरणाचे  कार्य करणाऱ्या मधमाशी सारखे उपयोगी कीटक तसेच किडींची संख्या कमी करणारे परोपजीवी कीटक कमी झाले.

५) विषमुक्त अन्न पदार्थांचे सेवन करून कॅन्सरसारख्या महाभयंकर आजार होऊ लागले.

जैविक कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर एक महत्त्वाचे अंग आहे. सेंद्रिय शेतीमध्ये वापरता येईल अशा काही निविष्ठांची आपण माहिती घेणार आहोत.

सेंद्रिय शेतीत वापरता येणारी आदाने

 ट्रायकोडर्मा

सेंद्रिय शेतीमध्ये ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीच्या वापराचे फायदे शेतकरी बंधूंना बदलत्या हवामानामुळे बदलत्या पीक पद्धतीमुळे वाढत्या सिंचनामुळे रोगकारक बुरशींची वाढ दिवसेंदिवस वाढत आहे. रोगकारक बुरशींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,  त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये मुळ कुज खोड कुज यासारखे रोग आढळून येत आहे, यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर केल्यास जमिनीतून होणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन करू शकतो , ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी जमिनीतील हानिकारक बुरशीच्या धाग्यांमध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरते व व त्यातील पोषकद्रव्ये शिक्षण फस्त करते ट्रायकोडर्मा ही बुरशी सीन व नावाची प्रतिजैविके निर्माण करते व रोगजन्य बुरशीच्या वाढीला मारक ठरते.

जीवामृत

जीवामृत हे एक प्रकारचे जिवाणूंचे विरजण आहे, सोबतच ते अत्यंत चांगले बुरशीनाशक विषाणू नाशक असल्याने त्याचा फवारणीने बुरशी विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येतो.

जीवामृत बनवण्याची पद्धत - साहित्य २०० लिटर पाणी + १०  किलो देशी गायीचे शेण+  ५ ते १० लिटर देशी गायीचे गोमूत्र+ २ किलो गुळ + २

 किलो बेसन+ एक किलो बांधावरची जिवाणू युक्त माती,  हे सर्व व्यवस्थित ढवळावे व ४८ तास झाकून ठेवावे.

 

रायझोबियम

रायझोबियम नत्राचे स्थिरीकरण करते आणि कडधान्य पिकांच्या मुळांना नत्र लवकर उपलब्ध होऊन मुळावर जास्त प्रमाणात गाठी लागतात परिणामी जास्त उत्पादन मिळते.  १५ ते २० टक्के  उत्पन्न वाढविण्यास मदत करते.

पीएसबी

हे जिवाणू सेंद्रिय शेतीमध्ये यासाठी खूप महत्त्वाचे आहे.  याला  स्फुरद विरघळणारे जिवाणू खत असे म्हणतात.  जमिनीमधील स्फुरद पिकांना मिळवून देण्यासाठी पीएसबी फार महत्त्वपूर्ण आहे. सोयाबीन, तूर, उडीद ,मूग यासारख्या महत्वाच्या पिकामध्ये पीएसबी या जिवाणू खताचा वापर केला जातो.  या जिवाणूंमुळे जमिनीतील फिक्स झालेला स्फुरद बऱ्याच प्रमाणात विरघळून मिळवून देण्यास कार्य करतात.

निंबोळी अर्क

निंबोळी अर्काचा उपयोग विविध किटक प्रतीबंधक व नियंत्रणासाठी केला जातो उदा. पांढरी माशी, मावा, तुडतुडे इत्यादी.

पाच  टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत

 उन्हाळ्यात निंबोळ्या उपलब्ध असताना त्या जमा कराव्यात या चांगल्या वाळून साफ करून त्याची साठवण करावी फवारणीच्या आदल्या दिवशी निंबोळ्या बारीक कराव्यात असा ५ किलो निंबोळीचा चुरा  ९ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी टाकावा . एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून चांगला गाळून घ्यावा. एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे व अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी मिसळावे वरील प्रमाणे तयार केलेला १ लिटर अर्क ९ लिटर पाण्यात मिसळून ढवळावा व फवारण्यासाठी वापरावा

बीजामृत

अमृताच्या प्रक्रियेसाठी मुळे उगवण शक्ती वाढते पिकाची वाढ जोमदार होत असल्यास हा अनुभव आहे.  

बीजामृत बनवण्याची पद्धत २०  लिटर पाणी, १ किलो देशी गाईचे शेण,  १ लिटर गोमूत्र,  १०० मिली दूध जिवाणू माती चुना मिसळून हे मिश्रण २० लिटर पाण्यामध्ये चांगले ढवळून घ्यावे.  पेरणीपूर्वी या मिश्रणाची बियाण्यावर प्रक्रिया करावी.

अमृतपाणी

अमृतपाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पावशेर देशी गायीचे तूप, १०  किलो शेण , अर्धा किलो मध,  दोनशे लिटर पाणी.

 अमृत पाणी बनवण्याची पद्धत

१०  किलो दहा किलो शेणामध्ये पावशेर तूप व अर्धा किलो मध मिसळून हे मिश्रण २०० लिटर पाण्यामध्ये चांगले ढवळून घ्यावे.

लेखक -

अतुल इंगळे

MSc (Agri)

8766984149

 

Organic Farming agripedia सेंद्रिय शेती कृषीपीडिया
English Summary: Read here useful things for organic farming

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.