जगभरातील हळद उत्पादक देशांचा विचार करता भारतात ८० टक्के हळदीचे उत्पादन घेतले जाते. त्यात महाराष्ट्र राज्यातही हळदीचे उत्पादन घेतले जाते. सातारा ,सांगली ,सोलापूर,परभणी नांदेड येथील ठिकाणी हळदीची मुख्यत्वे लागवड होते. अलीकडच्या काळात विदर्भातही हळदीचे क्षेत्र वाढत आहे. राज्यात हळदीच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. अशा हळदीच्या लागवडीविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हळद लागवडीसाठी हवामान व जमीन
उष्ण व कोरड्या प्रकारच्या हवामानात हळदीचे पीक चांगले येते. हिवाळ्यातील थंड हवामान हळदीच्या कंदास फार उपयुक्त असते. थंड हवा कंदास अनुकूल असल्याने हळदीची वाढ चांगली होते. हळदीच्या वाढीसाठी ३० डिग्री सेल्सिअस हवामान योग्य असते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी भुसभुशीत जमीन या पिकास फार उपयुक्त आहे.
पूर्वमशागत
जेवढी जमीन भुसभुशीत तेवढेच उत्पादन जास्त होते.त्यासाठी जमिनीची आडवी उभी नांगरट करून वखरणी करावी. दरम्यान हळदीच्या अनेक जाती आहेत. त्यातील काही वाण आहेत जे अधिक उत्पन्न देतात. त्यांची नावे खालीप्रमाणे -
सेलम, कृष्णा, फुले स्वरूपा, राजापुरी, वायगाव,
लागवडीचा हंगाम
हळदीच्या लागवड संपूर्ण मे महिन्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते.
बीज प्रक्रिया
हळदीच्या देण्यास किडींचा व बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून क्विनॉलफॉस २५ % प्रवाही २० मिली +२० ग्रॅम कार्बेन्डाझिम १० लिटर पाण्यात घेऊन बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करून झाल्यावर बेणे सावलीत सुकवावे.
लागवडीची पद्धत
१) सरी-वरंबा पद्धतीने लागवड करण्यासाठी ७५ सेंमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात व सरीच्या दोन्ही बाजूस ३० सेंमी ठेवून हळद बेणे लागवड करावी.
२) रुंद वरंबा व सरी पद्धत या पद्धतीने लागवड करायची झाल्यास १.५ मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात.यामध्ये १ मीटर गादीवाफा तयार होतो,त्यावर ३० सेंमी अंतर ठेवून बेणे लागवड करावी.
खत व्यवस्थापन
हळदी पिकासाठी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद,१०० किलो पालाश प्रति हेक्टरी आवश्यकता असते.यापैकी अर्ध्या नत्राची ची मात्रा हळद उगवल्यानंतर ३० दिवसांनी व उरलेली मात्रा ७० ते ७५ दिवसांनी द्यावी.
जल व्यवस्थापन
८ ते १० दिवसांच्या अंतराने आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार जल व्यवस्थापन करावे.
आंतरमशागत
हळदीच्या हळदीसाठी तण विरहीत शेत खूप महत्त्वाचे आहे.त्यामुळे आवश्यकतेनुसार ४ ते ५ खुरपण्या कराव्या.हळद ५ ते ६ पानावर आल्यावर मातीची भर द्यावी.
पीक कालावधी व काढणी
हळद साधारण ८ ते ९ महिने किंवा २१० ते २७० दिवसांत
पक्व होते. पिकाचे पान ५० टक्केपेक्षा पिवळी पडून सुकू लागल्या की समजावे हळद काढणीस आली आहे. काढणीच्या वेळी कंदाला कोणतीही इजा होऊं नये याची दक्षता घ्यावी. हळद पिकापासून २५० ते ३५० क्विंटल ओली मिळते यातून आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते.
लेखक
पूजा लगड , Msc( Agri) 9975075852
महेश गडाख MSc ( Agril maheshgadakh@gmail.com )
Share your comments