1. कृषीपीडिया

महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात वाढतेय उत्तर भारतातील राजमाचे क्षेत्र

काळानुसार शेतीच्या व्यवसायात बदल घडत चालला आहे. खरिपात हंगामात सोयाबीन घेतले जाते आणि रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात जसा राजमा चे उत्पादन घेतले जाते. त्याचप्रकारे महाराष्ट्र राज्यात सुद्धा राजमा ची लागवड केली जाते. राजमा हे पीक कमी दिवसात अधिक उत्पादन देते. एक शेंगवर्गीय पीक म्हणून राजमाकडे पाहिले जाते ज्यास श्रावणी घेवडा म्हणले जाते. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यामध्ये राजमाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते तर यावेळी अजून वाढेल असा अंदाज कृषीतज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्यमध्ये जवळपास ३१०५० एकर क्षेत्रावर राजमाची लागवड केली जाते तर यावेळी हे उत्पन्न वाढेल असे सांगितले गेले आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
Rajama

Rajama

काळानुसार शेतीच्या व्यवसायात बदल घडत चालला आहे. खरिपात हंगामात सोयाबीन घेतले जाते आणि रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात जसा राजमा चे उत्पादन घेतले जाते.त्याचप्रकारे महाराष्ट्र राज्यात सुद्धा राजमा ची लागवड केली जाते. राजमा हे पीक  कमी  दिवसात  अधिक उत्पादन देते. एक  शेंगवर्गीय  पीक  म्हणून राजमाकडे पाहिले जाते ज्यास श्रावणी घेवडा म्हणले जाते.पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यामध्ये राजमाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते तर यावेळी अजून वाढेल असा अंदाज कृषीतज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्यमध्ये जवळपास ३१०५० एकर क्षेत्रावर राजमाची लागवड केली जाते तर यावेळी हे उत्पन्न वाढेल असे सांगितले गेले आहे.


जमिन व हवामान कसे असावे:-

राजमाचे चांगले पीक येण्यासाठी हलकी तशीच मध्यम स्वरूपाची पाण्याचा निचरा करणारी जमीन लागते. चांगल्या प्रकारच्या जमिनीमध्ये या झाडांची वाढ होते मात्र शेंगा कमी लागतात. ५.५ - ६ असा जमिनीचा सामू असावा. श्रावणी घेवडा हे पीक पावसाळा आणि थंड हवामानात चांगले येते जे की यास १५ - ४० अंश सेल्सियस तापमान लागते. प्रति एकर ४० - ४५ बैलगाड्या शेणखत टाकावे तसेच पेरणी करण्याआधी मशागत करणे गरजेचे आहे.

लागवडीसाठी योग्य हंगाम:-

तिन्ही हंगामात याची लागवड केली जाते जशी की खरीप हंगामात जून, जूलै तसेच रब्‍बी हंगामात सप्‍टेबर, ऑक्‍टोबर महिना आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात याची लागवड केली जाते. कटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, व्‍ही.एल., 5 जंपा, पंत अनुपमा, फूले सुयश या जातीच्या वाणांचा खुप महत्व दिले जाते.

किड रोग व व्यवस्थापन:

मावा :-

मावा ही कीड घेवड्याच्या वाढणाऱ्या फांद्या तसेच लहान लहान पानांतील रस शोषून घेते. काहीवेळा फुले गळतात त्यावर मात करण्यासाठी १० लिटर पाण्यात ५ मिली सायपरमेथीन आणि १० मिली रोगोर मिसळून फवारणी करावी.

शेंगा पोखरणारी अळी :-

शेंगांच्या पृष्ठभागावर पहिल्यांदा ही अळी आढळते नंतर शेंगांच्या आत जाऊन दाणे खाते. यावर मात करण्यासाठी ५ टक्के कार्बोरील मिसळून फवारावे.

खोडमाशी :-

श्रावणी घेवड्याची लागवड केल्यानंतर १५ - २० दिवसाने याचा प्रादुर्भाव होतो. या किडीची मादी पानांवर अंडी घालते. नंतर अंड्यातुन अळी बाहेर पडते आणि त्या खोडावर तसेच खोडाच्या आतील भागात पोखरतात. यावर मात करण्यासाठी ५ मिली सायपरमेथीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

English Summary: Rajama area of ​​North India is growing in some districts of Maharashtra Published on: 08 November 2021, 08:22 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters