कांदा हे एक नगदी पीक आहे. कांदा (onion)हे पीक शेतकऱ्याला बक्कळ नफा मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोक हे कांदा लागवडीला प्राधान्य देत आहेत. बहुतांश कांदा पिकावर सर्वात जास्त परिणाम कारक हे वातावरण आणि नैसर्गिक वातावरणात असलेला बदल यामुळे होतो. त्यामुळं रोगराई पासून पीक वाचवण्यासाठी योग्य त्या वेळेत फवारणी करणे खूपच गरजेचे असते.सध्या लोकांचा पावसाळी कांदा शेतात आहे. आणि सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. अधिक पावसामुळे आणि पाण्यामुळे कांद्याची पात ही पिवळी पडत आहे. आणि शेंडे जळू लागले आहेत. यापासून जर का पीक वाचवायचे असेल तर या उपाययोजना करणे खूपच आवश्यक आहे.
कांदा सडण्याची कारणे:-
1)कांदा लागवड करताना कांद्याची वरील पात अर्धी कापलेली असते. सतत पडणाऱ्या पावसामुळं आणि हवामानात झालेल्या बदलामुळे कापलेल्या पातीत पाणी शिरते त्यामुळं कांदा नासायला किंवा सडायला सुरवात होते.
2)कांद्याची लागवड झाल्यावर त्याला वेगवेगळी खते घातली जातात. हे खत जर मुळीच्या जवळ पडते किंवा पतीच्या मध्ये पडल्यावर कांदा सडायला सुरवात होते.
3) कांदा लागवडीनंतर कमीत कमी 15 दिवस खतांचा डोस देऊ नये. युरियाचा लहानपणी वापर केल्यास पात वाढते आणि पातीचे आकडे होण्यास सुरुवात होते.
4)सतत पडणाऱ्या पावसामुळे रानात पाणी साचून राहिल्यामुळे रोपटी पिवळी पडतात आणि कांदा सडायला सुरवात होते.
जाणून घ्या उपाययोजना:-
1)सुरवातीला कांद्याच्या रोपांची लागण करताना रोपांच्या मुळ्या थोडा वेळ कार्बेनडीझम सारख्या बुरशी नाशक औषधामध्ये बुडवून ठेवायची किंवा रोपांच्या रुटबुस्टरची ट्रीटमेंट करावी.
2)कांद्याच्या रोपांची लागवड होऊन झाल्यावर एक महिना झाल्यावर किटक नाशकसोबत मायको सी सी हे औषध 15 लिटर पंपाला 5/7 मिली वापरावे आणि रोपांची वाढ योग्य नियंत्रणात ठेवावी.
3)ठिबक असलेल्या रानात कांद्याची लागवड केल्यावर शेतकऱ्यांनी प्रति एक एकर क्षेत्राला 250 मिली ह्युमिक ऍसिड आणि 500 ग्रॅम चिलेटेड मिक्स आणि मायक्रो न्यूट्रिमेंट 500 मिली ही औषधें ठिबक मधून सोडावी.
Share your comments