१७, १८, १९ ला पावसाची शक्यता
२० नंतर पुन्हा उघाड
बुलडाणा जिल्ह्यात दोन आठवड्यापासून जवळजवळ सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झाले आहे. त्यामुळे शेतांमध्ये ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने व परतीचा पाऊस लांबून पुन्हा पावसाची शक्यता वाढल्याने हरभरा पेरणीची घाई न करण्याचे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे.
परतीचा पाऊस आतापर्यंत जिल्ह्याबाहेर जाणे अपेक्षीत होते.
मात्र परतीचा प्रवास राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेशपर्यंत झाला आहे. महाराष्ट्र 'रिटर्न पाऊस' अजून आला नाही आला तर हा पाऊस दाणादाण उडवित असतो.
तसेच कमी दाबाचा पट्टा तयार होऊन आगामी काही दिवस पावसाची शक्यता देखील असल्याचे कृषीतज्ञांचे म्हणणे आहे. अशावेळी हरभरा पेरणी केल्यास बिज खराब होण्याची शक्यता वाढते. सध्या सोयाबीनचा हंगाम सुरु आहे. जिथे पहिली पेर आहे अशा ठिकाणी सोयाबीन काढणीला आले आहे. तर चार दोन दिवसात जवळजवळ सर्वच ठिकाणी सोयाबीनची कापणी होणार आहे. सोयाबीननंतर शेतकरी लगेच हरभरा पेरणी करतात. मात्र यंदा झालेले दमदार पाऊस पाहता अजून शेतामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे.
अशावेळी बी कुजण्याचा धोका वाढत असल्याने २० ऑक्टोबर पर्यंत घाई न करण्याचे आवाहन कृषीतज्ञांनी केले आहे.
सोयाबीन काढणीचा हंगाम आटोपत आहे. अशावेळी शेतकरी हरभरा पेरणीकडे वळतात. यंदा परतीचा पाऊस अजूनही न गेल्याने पाऊस येऊ शकतो. तर कमी दाबाचा पट्टा तयार होवून अवकाळीची शक्यता देखील आहे. त्यामुळे उघाड आल्यानंतरच हरभरा पेरणी करावी.
२० ऑक्टो. नंतर उघाडीची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
लेखक - डॉ. गिरीश जेऊघाले,
वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ, पीकेव्ही अकोला
Share your comments