त्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आंबेगाव तालुक्यामधून बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी देण्याचा पहिला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैलगाडा शर्यतीसाठी परवानगीची प्रक्रिया विचारण्यासाठी गावावरून नागरिक येत आहेत. दरम्यान बैलगाडा शर्यतेचे आयोजन करण्याच्या किमान 15 दिवस आधी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात करावा लागणार आहे.
बैलगाडा शर्यतीसाठीची नियमावली कृषी व पशुसंवर्धन विभागाने नोव्हेंबर 2017 मध्ये जारी केली आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी परवानगीची प्रक्रिया विचारण्यासाठी गावावरून नागरिक येत आहेत.यामध्ये शासनाने विविध अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. बैलगाडा आयोजकांकडे सहभागी होणाऱ्या बैलांचे छायाचित्र 48 तास आधी द्यावे लागणार आहे. तसेच नोंदणीकृत पशुवैद्यकीय यांच्याकडून बैलाची तपासणी करून ते निरोगी असल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र असेल तरच बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेता येणार आहे.
महत्त्वाचे नियम
- आयोजकांच्या ओळखीचा पुरावा, पत्ता
- 50 हजार रुपयांची बॅंक गॅरंटी
- नियमांचे उल्लंघन झाल्यास जिल्हाधिकारी ही रक्कम जप्त करू शकतात
- बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणांची अधिकारी करणार तपासणी
- कागदपत्रांची पूर्तता असेल तर सात दिवसांत मिळेल परवानगी
- नियमांचे उल्लंघन अथवा कागदपत्रांची पूर्तता नसले तर परवनागी रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना
- बैलगाडा शर्यतीच्या धावण्याचे अंतर जास्तीत जास्त एक हजार मीटर
- बैलगाडा शर्यतीच्या प्रेक्षकांची सुरक्षेची व्यवस्था करणे आवश्यक
Share your comments