भारतात आता कृषी क्षेत्रात नवनवीन बदल आपल्याला दिसत असतील. शेतकरी बांधव आता परंपरागत शेतीला टांग देऊन आधुनिक शेतीकडे वळत आहेत आणि ही काळाची गरज पण आहे. शेतकरी बांधव आता खरीप रब्बी आणि उन्हाळी ह्या फंद्यात न पडता नकदी पिकांकडे अधिकाधिक आरूढ होताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर आता सरकारदेखील ह्या कामात शेताकऱ्यांना प्रोत्साहित करताना दिसत आहे.
अलीकडील काही वर्षात भाजीपालाच्या क्षेत्रात खुपच मोठ्या प्रमाणात वाढ झालीय आणि परिणामी भाजीपाल्यांचं उत्पादनात देखील दिन दोगुणी रात चौगुणी वाढ झालीय. शेतकऱ्यांना नक्कीच याचा खुप फायदा झालाय. अशाच भाजीपाला पिकांपैकी एक आहे मिर्चीचे पिक मिर्चीविना आपल्या आहारातील कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही. भाजीपासून ते मिरचीच्या ठेचापर्यंत सर्व्यात गोष्टीसाठी मिरचीची आवश्यकता असते.मीठ आणि मिरचीशिवाय आपल्या भाजींचा स्वाद अपूर्णच राहतो.हेच कारण आहे की मिरचीची मागणी बाजारात सदैव बनलेली असते आणि म्हणुनच मिरची पिकाची लागवड शेकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा ठरू शकतो.आणि जर अशातच मिरचीच्या सुधारित वाणाची निवड करून जर शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली तर मग नक्कीच सोने पे सुहागा असं काम होईल.आणि शेतकऱ्यांच्या कमाईत अजून वृद्धी होईल.
जसे शेतकरी बांधव दुसऱ्या पिकांच्या लागवडीच्या वेळी सुधारित जातींची निवड करतात तशेच मिरची लागवडीच्या बाबतीत जर केले तर नक्कीच शेतकरी अधिकच फायदा प्राप्त करू शकतात.चला तर मग जाणुन घेऊया मिरचीच्या सुधारित जातीविषयी
मिरचीच्या टॉप सुधारित जाती
1.काशी अर्ली
नावातच 'लवकर' असा शब्दप्रयोग आपल्याला दिसतोय. म्हणुन नावाप्रमाणेच, मिरचीची ही जात सुमारे 45 दिवसात काढणीस तयार होते, तर इतर संकरित वाणांना सर्वसाधारणपणे 55 ते 60 दिवस लागतात. ह्या जातीत मिरचीची काढणी एका आठवड्याच्या अंतराने करता येते. ह्या जातीतून मिरची जवळपास 10 ते 12 वेळा तोडणीसाठी तयार होते. प्रति हेक्टर उत्पादन 300 ते 350 क्विंटल पर्यंत देते. मित्रांनो एवढच नाही तर हिरव्या मिरच्यांसाठी ही सर्वोत्तम वाण मानली जाते.
2.तेजस्विनी
मिरचीच्या या जातीमध्ये मिरच्या या मध्यम आकाराच्या असतात. मिरचीची लांबी सुमारे 10 सेंटीमीटर पर्यंत असते. 75 दिवसांत पहिल्या तोडीसाठी पीक तयार होते. ह्या जातींच्या हिरव्या मिरच्यांचे सरासरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल पर्यंत असते.
3.काशी तेज (CCH-4) F1 हायब्रिड
मिरची लाल करून विकण्यासाठी किंवा तशाच हिरव्या म्हणुन विक्रीसाठी दोन्ही हेतूंसाठी शेतकरी या प्रकारच्या मिरचीची लागवड करतात. ही वाण जवळपास 35 ते 40 दिवसात उत्पादणासाठी तयार होते याचा अर्थ खूप लवकर मिरचीचे पिक तयार होते.
ही जात चव मध्ये खूप तिखट असते आणि मिरची पिकात होणाऱ्या रोगापासून सडण्याचे प्रमाण यात खुप कमी असते. एका हेक्टरमध्ये उत्पादन साधारणपणे 135 ते 140 क्विंटल पर्यंत असते.
4.पंजाब लाल
गडद हिरव्या पानांसह मिरचीची ही जात आकारात बुटकी आणि लाल रंगाची असते. मिरचीचा पहिला तोडा तयार होण्यासाठी सुमारे 120 ते 180 दिवस लागतात. मिरचीचे उत्पादन हेक्टरी 110 ते 120 क्विंटल आणि वाळल्यावर 9 ते 10 क्विंटल असते.
Share your comments