खरीपची तयारी करत आहात? बियाणे खरेदी करतेवेळी काय घ्याल काळजी

15 May 2021 11:18 AM By: KJ Maharashtra
बियाणे खरेदी करतेवेळी काय घ्याल काळजी

बियाणे खरेदी करतेवेळी काय घ्याल काळजी

आता काही दिवसांमध्ये पेरणीचे दिवस डोक्यावर येऊन ठेपले आहेत सगळीकडे खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले की वेग  वेगळ्या भागांमध्ये पेरणीला  सुरुवात होते. परंतु आपल्याला माहिती आहे की पेरणीसाठी उत्कृष्ट प्रमाणित बियाणे असणे हे फार आवश्यक असते. बियाणे जर निकृष्ट दर्जाचे असेल तर त्याचा पूर्ण फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आणि पूर्ण हंगाम वाया जातो.

तसे पण मागच्या वर्षी पाहिले की  सोयाबीन पट्ट्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही परिणामी याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. म्हणून बियाणे खरेदी करायच्या अगोदर बळीराजाने कोणती काळजी घ्यावी यासंबंधीचे विवेचन या लेखात करण्यात आले  आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ते आपण पाहू.

    बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी

  • सगळ्यात अगोदर लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे बियाणे खरेदी करताना ते परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे.

  • दुसरे महत्त्वाचे म्हणजे जेव्हा बियाणे खरेदी कराल तेव्हा संबंधित विक्रेत्याकडून पक्के बिल  घेण्यास विसरू नये. त्या बिलावर दुकानाचे नाव, खरेदीदाराच्या नाव, बियाणे उत्पादकाचे नाव, लॉट क्रमांक, आणि विक्रीची किंमत आहे की नाही याची खात्री करावी. तसेच दिल्या गेलेल्या पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची सही किंवा अंगठा हवा असणे गरजेचे आहे.

  • जर विक्रेते कच्चे बिल देत असेल तर ते कदापि स्वीकारू नये. पक्या बिलासाठी आग्रह धरावा तसेच मिळालेल्या बिल हे व्यवस्थित जपून ठेवावे.

  • जेव्हा आपण बियाणे खरेदी करतो तेव्हा त्या संबंधित बियाण्याचे पिशवी वर किंवा पाउच वर एक लेबल असते त्या लेबलवर पिकाचे नाव व त्या पिकाची उगवण शक्ती, संबंधित बियाण्याची भौतिक व आनुवंशिक शुद्धता टक्केवारी, संबंधित बियाण्याची चाचणीची तारीख, त्याचे महिना व वर्ष, वजन, बीजप्रक्रियेसाठी वापरले गेलेले रसायन आणि किंमत इत्यादी गोष्टींचा उल्लेख तपासावा. मुख्यत्वेकरून कपाशीच्या बियाण्याच्या पाउच वर लेबल राहत नाही तर त्यावर मागच्या बाजूला वरील सगळी माहिती छापील दिलेली असते

 

  • तेव्हा आपण बियाणे खरेदी करतो तेव्हा दिल्या गेलेल्या पावतीवर छापील बिल  क्रमांक असल्याची खात्री करावी. तसेच बियाणाची पिशवी तिन्ही बाजूंनी शिवलेली असावी. वरील बाजू ही प्रमाणपत्रासह शिवलेली असते.

  • जेव्हा बियाणाची पिशवी फोडाल तेव्हा ती काय खालच्या बाजूने फोडावी. कारण त्यामुळे पिशवी असलेले लेबल व बीज प्रमाणीकरण यंत्रणा चा त्या व्यवस्थित राहतो ते लेबल आणि टॅग व्यवस्थित जपून ठेवावे.

  • मुदतबाह्य झालेले तसेच पॅकिंग फोडलेले छोटे बियाणे खरेदी करू नये.

  • आंतरराज्य वस्तूंच्या पॅकिंग वर किंमत छापणे कायद्याने बंधनकारक असते. त्यामुळे बियाण्याच्या पिशवी वर असल्यास किंवा विक्रेता पिशवी वरील किमतीपेक्षा जास्त आकारणी करत असेल तर ही बाब जिल्हा वजनमापे निरीक्षकाच्या निदर्शनाला आणावी. या संबंधित विभागाचे अधिकारी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असतात.

  • बियाणं विषयी काही तक्रार असेल तर तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाकडे लेखी स्वरूपात तक्रार द्यावी.

 

वरील दिल्या गेलेल्या गोष्टींचे जर आपण अचूक व तंतोतंत पालन केले तर वापर होणाऱ्या फसवणुकीपासून आणि मिळणाऱ्या निकृष्ट बियाणे पासून वाचू शकतो. म्हणजे भविष्यात होणारे संभाव्य आर्थिक नुकसान आपण टाळू शकतो.

kharif खरीप पीके खरीप हंगाम बियाणे खरेदी buying seeds
English Summary: preparing for kharif? Take care when buying seeds

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.