मित्रहो पारंपारिक शेती कडून आधुनिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे हे सत्य परिस्थिती असून सर्व ह्याबाबत माहीत असणं महत्त्वाचं आहे आपन शेतकरी पारंपारिक शेतीमधील बऱ्याच गोष्टी अजूनही टिकवणं ही सुद्धा भविष्य काळाची गरज आहे,
त्याचाच अर्थ पारंपारिक शेती व आधुनिक तंत्रज्ञान या दोघांची सांगळ घालून आधुनिक शेती करणे हे शेतकर्यांकरिता जास्त महत्त्वाचे वाटते. याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे शेतीच्या हंगामाला सुरवात करण्याअगोदर म्हणजे उन्हाळ्यात शेतीच्या तब्बेतीची तपासनी करून घेणे हे सर्व शेतकऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. आणि त्याकरिता माती परीक्षण करणे खूप गरजेचंआहे.आपला
शेतकरी एकाच वर्षामध्ये एका मागोमाग पिके घेत असतो.
त्यामुळे काय होते कि जमिनीला विश्रांती मिळतच नाही. त्याच बरोबर सिंचनामधे भरपुर वाढ झाली व शेती सुविधामध्ये वाढ झाल्याने रासायनिक खतांचा असंतुलित वापर आपन करु लागलो.परीनाम आपल्या जमिनीमधील अन्नद्रव्यांच पिकांनी शोषण केल्या मुळे मातीच्या सुपिकता घटत गेली. माती बरोबर पाणी ही प्रदूषित झाले आहे.आपल्या साठी अमुल्य जमीन आणी पाणी या नैसर्गिक स्त्रोत असलेली संपत्ती नष्ट होत आहे. शेती मधे पिकांच्या पोषणासाठी संतुलित अश्या अन्नद्रव्यांची गरज असते. रासायनिक खतांची पूर्ण मात्रा देऊनही उत्पादनवाढीस मर्यादा आल्या आहेत उलट उत्पादनाची घट झाली आहे, त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी जमीन तपासणी म्हणजे माती परीक्षण करणे महत्त्वाचे आहे.आता थोडं समजून घेऊ या की मातीचे नमुने कोणत्या पद्धतीने घ्यावे.
नक्की वाचा:सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना , जातीच्या राजकारणात अडकवून कसे फसविले ?
मित्रांनो आता उन्हाळ्याचा हंगाम चालु आहे म्हणजेच एप्रिल व मे महीना आहे महत्वाचं म्हणजे मातीचा नमुना घेण्यासाठी योग्य वेळ हीचआहे. शक्य तो मातीचा नमुना मशागत पुर्वी किंवा नांगरणीपूर्वी घेणे आवश्यक आहे. जर वाटत असेल तर जमिनीवर पीक काढताना मातीचा नमुना घ्यायचा असेल तर खते दिल्यावर दोन महिन्यांनी पिकांच्या दोन ओळींमधून घ्यावा.भाजीपाला व नगदी पिकांसाठी दोन वर्षातून एकदा मातीचा नमुना घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे इतर पिकांसाठी शेतातील मातीचा नमुना किमान दोन ते तीन वर्षातून एकदा घ्यावा.आपल्या मातीचा नमुना कसा घ्यावा हे माहीत करून घेणे महत्त्वाचे आहे.साधारणता पिकांसाठी व एकसारखी जमीन असल्यास दोन हेक्टर जमिनीतून मातीचे ५ते६ नमुने घ्यावे परंतु एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची जमीन उदा०रंग, उतार, क्षारयुक्त, चोपण खोलगट काळी, भुरकट, उथळ इत्यादी असल्यास प्रत्येक प्रकारच्या जमिनीतून एक स्वतंत्र नमुना घ्यावा.
मातीचा नमुना घेण्यासाठी गिरमिट , पहार, कुदल, फावडे, खुरपे तसेच घमेले किंवा बादली, प्लॅस्टिक कापडी टेबल इत्यादी साहित्य लागते.
नमुना घेताना जमिनीच्या पृष्ठभावरील पालापाचोळा, लहान-मोठे दगड बाजूला करून शेतामधील 10 ते 15 ठिकाणाहून 15 ते 30 सें.मी. खोलीपर्यंतचा एकसारखा जाडीचा मातीतील थर घमेले अथवा बादलीत घ्यावा. खुरपे किंवा फावडे यांचा उपयोग करायचा असेल तर एक ‘व्ही’ आकाराचा 30 सें.मी. खोलीचा खड्डा खोदावा. या खड्ड्यातील एका बाजूने सारख्या जाडीची वरपासून खालपर्यंतची माती खुरप्याच्या साहाय्याने घ्यावी. सुक्ष्म अन्नद्रव्य तपासणीसाठी नमुना घ्यावयाची पद्धत : सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी नमुना घेताना वरीलप्रमाणे व पिकाच्या प्रकारानुसार खड्डा घ्यावा. नंतर खड्ड्याच्या एक इंच जाडीची कड लाकडी कामटीने (पट्टीने) किंवा प्लॅस्टिकच्या पट्टीने प्रथम खरवडून काढावी व जमा झालेली माती खड्ड्यातून काढून ती अर्धा किलो माती वरीलप्रमाणे स्वच्छ कापडी पिशवीत संपूर्ण आमच्या कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती माहितीसह प्रयोगशाळेत परिक्षणास पाठवावी अशा रितीने शेतातील प्रत्येक विभागातून मातीचे नमुने घेऊन ते बादली किंवा घमेल्यात एकत्र करावेत. त्यातील काडीकचरा, दगड बाजूला काढून माती चांगली मिसळावी व ती त्या प्लॅस्टिक कापडावर टाकावी. या मातीचे सारखे चार भाग करून समोरासमोर दोन भाग ठेऊन बाकीची माती परत चांगली मिसळून त्याचे चार भाग करून समोरासमोराचे दोन भाग ठेऊन बाकीची माती वेगळी करून टाकावी.
अशा रितीने अंदाजे अर्धा किलोपर्यंत मातीचा नमुना घ्यावा. ही अर्धा किलो माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी. एका कागदावर पुढीलप्रमाणे माहिती लिहून तो कागद पिशवीत टाकावा.आनखी महत्त्वाचे म्हणजे कागदावर जमिनीचा गट नं. क्षेत्र, शेतकर्यांचे संपूर्ण नाव, गाव, पूर्ण पत्ता, फोन नं., मागील वर्षाचे पीक, पुढे घ्यावयाचे पीक इत्यादीबाबत माहिती लिहावी.काही आपल्या अडचणी आल्यास कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांच्यासोबत संपर्क साधावा....!
धन्यवाद
श्री प्रमोद मेंढे
विषय विशेषज्ञ(कृषी विद्या) कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती
मों न 9423109071
माहीती संकलण
मिलिंद जि गोदे
Share your comments