शेतकरी अलीकडे नगदी पिकांच्या लागवडीला प्राधान्य देतांना दिसत आहेत आणि या नगदी पिकांच्या लागवडीतून चांगली कमाई देखील करत आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेतीची कार्य शिकून आधुनिक शेतीमध्ये ह्याचा वापर करत आहेत. म्हणुन शेतीतली नवीन टेक्निक शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होत आहे आणि शेतकऱ्यांना यातून लाखो रुपयांचा फायदा होत आहे. शेतीत आलेली नवीन टेक्निक, शोध, अविष्कार याचा उपयोग करून शेतकरी बांधव पारंपरिक पिकांची आधुनिक पद्धतीने लागवड करून आपले उत्पादन व उत्पन्न वाढवीत आहे.
देशात वेगवेगळ्या पिकांच्या नवीन जातीचा शोध लावला जातो, पिकाच्या या सुधारित जातींची लागवड करून शेतकरी संपन्न बनत आहे. आज आपण हळदीच्या सुधारित जातीविषयी जाणुन घेणार आहोत, ह्या सुधारित जातीची लागवड करून हळद उत्पादक शेतकरी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया हळदीच्या प्रतिभा या जातीविषयी.
भारतात बऱ्यापैकी हळद लागवड केली जाते, महाराष्ट्रात देखील हळदीची लागवड केली जाते. आणि हळद उत्पादक शेतकरी यातून चांगली कमाई करतात. हळद एक मसाला पीक आहे, तसेच याचा उपयोग औषधी वनस्पती म्हणुन देखील केला जातो. तसेच हळदिला सनातन हिंदु धर्मात एक विशिष्ट महत्व प्राप्त आहे. हळदीच्या या गुणधर्मामुळे हळदीला खुप मागणी असते. त्यामुळे हळदीचे पीक शेतकऱ्यांना फायद्याचे सिद्ध होत आहे.
असे असले तरी हळद लागवड करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, जसे की चांगल्या जातीची लागवड करणे इत्यादी त्यामुळे आज आपण हळदीच्या प्रतिभा जातीची माहिती जाणुन घेऊ.
हळदीची प्रतिभा हि एक सुधारित जात आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केरळच्या कोझिकोड कोल्ड इंडियन स्पाईस रिसर्च इन्स्टिट्यूटने हि सुधारित वाण विकसित केली आहे.
कृषी वैज्ञानिक या जातीच्या लागवडीची शिफारस करतात. जर आपणांसहि हळद लागवड करायची असेल तर आपण या जातीचा विचार करू शकता. आपल्याकडे जर भांडवल जास्त असेल तर आपण 2 लाख रुपये खर्च करून ह्या जातीतून जवळपास 14 लाख रुपयांची कमाई करू शकता. शेतकरी बांधवांनी प्रतिभा जातीची लागवड केली तर ते कितीतरी पटीने अधिक उत्पन्न मिळवू शकतात.
Share your comments