सध्या शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे जे प्रमाण असते ते ०.५ टक्के च्या खाली चालले आहे त्यामुळे आता शेतजमिनीला सेंद्रिय खत देणे खूप गरजेचे झाले आहे. अनेक प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत त्यामध्ये कोंबडी खत हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्यामुळे जमिनीची भौतिक तसेच रासायनिक आणि जैविक क्षमता सुधारते. सेंद्रिय खताचा वापर जर वाढला तर रासायनिक खताची दहा टक्के पर्यंत बचत होणार आहे. बागायती शेतीला कोंबडी खताचा वापर चांगला होतो जसे की ऊस पीक असो किंवा फळबागा आणि फुलझाडांना कोंबडी खताचा चांगला फायदा होतो.
कोंबडी खत म्हणजे काय?
कोंबडीची विष्टा तसेच लाकडाचा भुसा आणि साळीचा भुसा, शेंगाची टरफले एवढे सर्व घटक कुजल्यानंतर जो घटक तयार झालेला असतो त्यास कोंबडी खत असे म्हणतात. प्रति वर्षाला एक हजार कोंबड्यांपासून १४ टन एवढे कोंबडी खत तयार होते.
खताचे महत्त्व :-
कोंबडी खतामध्ये जवळपास १३ मुख्य घटक आढळतात जे की त्या १३ मध्ये नत्र आणि स्फुरद हे घटक जास्त प्रमाणात आढळतात. कोंबडी खतामध्ये जे नत्र असते ते अमोनिया, नायट्रेट, युरिक ॲसिड यामध्ये असते. तर कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, सोडिअम, फेरस, मंगल, मॉलिब्डेनम, बोरॉन, झिंक, कॉपर ही अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त उपलब्ध होतात.
खत तयार करण्याची पद्धत :-
१. पोल्ट्री शेडमधून लिटर बाहेर काढल्यानंतर त्याचा थर योग्य प्रकारे लावावा.
२. एक टन कोंबडी लितरसाठी तुम्हाला जवळपास दोन किलो कंपोस्ट जिवाणू
संवर्धक मिसळावे लागणार आहे.
३. ३० ते ४० टक्के प्रमाणत त्यावर ओलावा राहील प्रमाणत त्यावर पाणी
शिंपडावे.
४. जो खताचा ढीग आहे त्याची चाळणी एक महिन्याच्या अंतराने २ ते ३ वेळा
केली पाहिजे.
५. ४० ते ५० अंश सेल्सिअस ढिगाचे तापमान राहावे.
६. कोंबडी खताची चांगली गुणवत्ता तयार करायची असेल तर जवळपास पाच
महिन्याचा कालावधी लागतो.
७. कोंबडी खतांच्या ५ ते २५ किलो च्या बॅग सुद्धा तयार करून बाजारात
विकल्या जात आहेत.
ते उभ्या पिकात तसेच जमिनीमध्ये आजिबात मिसळू नये. जर ताजे खत तुम्हास उभ्या पिकाला द्यायचे असेल तर एक महिना आधीच कोंबडी पिकावर पाणी मारावे आणि त्यास थंड होऊन द्यावे म्हणजे त्यामध्ये जे कर्ब नत्र आहेत त्याचे गुण स्थिर राहतील त्यामुळे त्यामध्ये असणारी जी अन्नद्रव्ये आहेत ती पिकांना उपलब्ध होतात. ज्यावेळी तुम्ही उभे पीक असलेल्या पिकाला खत देणार आहे त्यावेळी जमिनीमध्ये ३० ते ४० टक्के ओलावा असणे गरजेचे आहे. जर जमिनीमध्ये ओलावा नसेल तर पीक पिवळे पडायला सुरुवात होते. जे ताजे कोंबडी पीक आहे ते लगेच पिकांना वापरुच नये. तसेच प्रति एकर पिकाच्या लागवडीनुसार ५ ते २० टन खताचा वापर करावा.
Share your comments