भारतात शेतकरी बांधव आता पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत आहेत, आणि नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. यातून त्यांना चांगला नफा देखील प्राप्त होतो. आज आपण अशाच एका झाडाच्या लागवडी विषयी जाणून घेणार आहोत, याची लागवड शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा चौदा सिद्ध होऊ शकते. आम्ही ज्या झाडा विषयी बोलत आहोत ते आहे पॉपलर चे झाड, पॉप्युलर चे झाड हे खूप दुर्मिळ आहे आणि म्हणून याची मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. पॉप्युलर झाडाची लागवड भारतात थोड्या प्रमाणात का होईना बघायला मिळते, परंतु भारतात आजवर याची व्यावसायिक शेती बघायला मिळालेली नाही. राज्यात देखील हे झाड आढळते परंतु राज्यातही याची व्यवसायिक शेती होत नाही. परंतु भारतात या झाडाची लागवड ही केली जाऊ शकते या झाडासाठी भारतात पोषक वातावरण असल्याचे सांगितले जाते राज्यात देखील या झाडासाठी पोषक वातावरण आहे.
कुठे कुठे आढळतात पॉपलरचे झाडे
भारतात पॉपलरचे झाडे आढळतात, पॉप्युलरची शेती ही मुख्यतः विदेशात केले जाते. नोर्थ अमेरिका, युरोप,आशिया आफ्रिका या खंडातील अनेक देशात पॉपलरची शेती केली जाते. पॉपलरची शेती ही मुख्यतः लाकडासाठी केली जाते. याच्या लाकडापासून पेपर बनवला जातो तसेच हलके फर्निचर, चॉपस्टिक, माचिस इत्यादी तयार केले जाते.
पॉपलर झाडाच्या लागवडीसाठी आवश्यक हवामान
या झाडाच्या लागवडीसाठी भारतातील तापमान हे पोषक असल्याचे सांगितले जाते. या झाडासाठी किमान तापमान 5 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान योग्य असल्याचे सांगितले जाते. या झाडाला सूर्यप्रकाशाची सर्वात जास्त गरज असते, त्यामुळे याची लागवड बर्फाळ प्रदेशात करता येऊ शकत नाही. ज्या जमिनीचा पीएच सहा ते 8.5 दरम्यान असतो ती जमीन या झाडाच्या लागवडीसाठी योग्य असल्याचे सांगितले जाते.
या झाडात घेतले जाणारे आंतरपीके
या पिकात आपण अनेक आंतरपिके घेऊ शकतात, या पिकात मुख्यतः गहू ऊस हळद, बटाटे टोमॅटो कोथिंबीर इत्यादी पिकांची आंतरपीक म्हणुन लागवड केली जाऊ शकते. या झाडाची लागवड करताना दोन झाडांमधील अंतर हे 12 ते 15 फूट या दरम्यान असावे.
कुठून घेणार या झाडाची रोपे
जर तुम्हाला या झाडाची रोपे विकत घ्यायची असतील, तर तुम्ही डेहराडूनच्या वन संशोधन विद्यापीठ, गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठ, मोदीपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी केंद्रांमधून सहज घेऊ शकता.
याच्या लागवडीतून किती होणार कमाई
या झाडाचे लाकूड जवळपास सातशे ते आठशे रुपये किलोप्रमाणे विकले जाते. एका झाडाची लाकडे हे जवळपास दोन हजार रुपयाला विकली जातात. एक हेक्टर क्षेत्रात जवळपास अडीचशे झाडांची लागवड केली जाऊ शकते या झाडांची जर योग्य पद्धतीने काळजी घेतली गेली तर एक हेक्टर क्षेत्रातून आपण सात लाखापर्यंत उत्पन्न सहज प्राप्त करू शकता. या झाडांची उंची ही जवळपास ऐंशी फुटांपर्यंत असते ही या झाडाची सर्वात मोठी विशेषता आहे.
Share your comments