जे शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीला सोडून काही नवीन करू इच्छितात, अशा शेतकऱ्यांसाठी हा लेख फायदेशीर ठरणार आहे. जे शेतकरी प्रयोगशील आहेत त्यांच्यासाठी जरबेरा फुलांची शेती फायद्याची ठरणार आहे. तसे पाहिले तर आपल्या देशात अल्पभूधारक आणि छोटे शेतकरी बऱ्याच वर्षापासून पारंपरिक शेतीवर अवलंबून आहेत.
परंतु शेतीमध्ये चांगला नफा मिळवायचा असेल तर तंत्रज्ञान युक्त संरक्षित शेती करणे फायदेशीर असते. या लेखात आपण जरबेरा फुलांची शेती पॉलिहाऊसमध्ये कशी करावी त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
जरबेराच्या कोणत्या फुलांना बाजारात असते मागणी?
पॉली हाऊसमध्ये विदेशी प्रजातीच्या फुलांची लागवड करून चांगले काम करता येऊ शकते. अशा फुलांची बाजारात नेहमी मागणी असते. पॉलिहाऊस मध्ये फुलांची शेती करण्याचा फायदा असा असतो की, पाली हाऊसमध्ये विशिष्ट हंगामात येणाऱ्या फुलांची ही लागवड करता येते. त्यामुळे आपण हंगामावर अवलंबून असणारी मागणी कोणत्याही वेळी पूर्ण करू शकल्याने चांगले उत्पन्न मिळू शकते. तसे पाहिले तर बाजारामध्ये ऑर्किड, गुलाब, जरबेरा, ग्लॅडिओलस, कार्नेशन त्याची प्रजातींच्या फुलांची कायम मागणी असते.
पॉलिहाऊस मध्ये कशी करावी जरबेराची शेती?
जरबेरा विविध प्रकारच्या आकर्षक रंगांमध्ये असल्यामुळे सजावटीमध्ये त्यांचा बहुतांशी उपयोग होतो. जरबेरा फुलाचे उगमस्थान पाहिले तर आफ्रिका आहे. या फुलाची उत्पादन वर्षभर घेता येते. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून जरबेराची लागवड उत्पन्नाचे चांगले साधन आहे. जरबेरा प्रजातीचे फुल हे लाल, सफेद, पिवळ्या, नारंगी इत्यादी रंगाचे असते. फुलदाणीमध्ये हे फुल बरेच दिवस ताजेतवाने राहते, म्हणून गुलदस्ता आणि स्टेजच्या सजावटीसाठी या फुलाचा महत्वपूर्ण उपयोग होतो.
जरबेराच्या प्रमुख जाती
लारा, डॉल्फिन, संटल, ओलंपिया, नवादा आणि कोरमरॉन या जरबेराच्या प्रमुख जाती आहेत.
आवश्यक हवामान आणि माती
जरबेरा फुलाचे पॉलिहाऊसमध्ये यशस्वीपणे लागवड करता येते. त्यासाठी पॉलि हाऊसमधील दिवसाचे तापमान २२ ते २५ डिग्री सेल्सियस आणि रात्रीचे तापमान १२ ते १६ डिग्री सेल्सिअस असणे आवश्यक असते. जरबेरासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि सेंद्रिय घटकांनी युक्त माती आवश्यक असते.
पॉलिहाऊसमधील तयारी
सगळ्यात अगोदर पॉली हाऊसमध्ये मातीला चांगल्या पद्धतीने भुसभुशीत करून घ्यावे. त्यानंतर एक मीटर रुंद आणि ३० मीटर उंच बेड तयार करावेत. त्यानंतर एक भाग वाळू, एका भागात नारळाच्या भुसा आणि एका भागामध्ये शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट यांचे मिश्रण करून बेडवर टाकावे.
पाण्याची आवश्यकता
जरबेराच्या रोपांसाठी दररोज पाण्याची आवश्यकता असते.
हेही वाचा :ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत करा करडईची पेरणी; जाणून घ्या! लागवड तंत्रज्ञान
रोपांची लागवड कशी करावी?
तयार केलेल्या बेडवर जरबेराची लागवड करताना दोन रांगेतील अंतर ३० ते ४० सेंटीमीटर तसेच दोन रोपांमधील अंतर ३० सेंटीमीटर असावे.
खतांची आवश्यकता
जास्त उत्पन्नासाठी रोपांच्या लागवडीनंतर अगोदरच्या तीन महिने प्रत्येक दोन दिवसानंतर एम पी के खताची मात्रा प्रति रोप दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात असावी. तसेच रोपांच्या लागवडी अगोदर शेणखत १० किलो प्रति वर्ग मीटर या प्रमाणात टाकावे. लागवडीनंतर ३ महिन्यांपर्यंत एम पी के १० ग्रॅम, १५ ग्रॅम आणि २० ग्रॅम प्रति वर्ग मीटर या हिशोबाने द्यावे. जेव्हा फुल येणे सुरू होते त्यानंतर एम पी के १५,१० ३० प्रति वर्ग मीटर या प्रमाणात तीन महिन्यांपर्यंत प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. तसेच १.५ प्रति लिटर या प्रमाणात कॅल्शियम, बोरन, मॅग्नेशियम आणि कोपर सारखे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मिश्रण करून फवारा करावा.
या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे
-
नवीन पात्यांच्या वाढीसाठी वेळोवेळी फुलांचे जुने पाते काढून टाकावेत.
-
रोपांच्या चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर दोन महिन्यांपर्यंत फुलांच्या कळ्यांना तोडून घ्यावे त्यानंतर फुल येऊ द्यावे.
-
वेळोवेळी ओपन मधील गवत काढून क्षेत्र तणमुक्त ठेवावे.
फुलांची तोडणी
जरबेराच्या लागवडीनंतर ३ महिन्यानंतर फुल येणे सुरू होते. फुलांची तोडणी सकाळी किंवा संध्याकाळी करणे फायदेशीर असते. प्रत्येक वर्षी प्रति वर्ग मीटर २०० ते ३०० फुलांचे उत्पादन होते. एकावेळेस लावणी केल्यानंतर २४ ते ३० महिन्यांपर्यंत फुलांचे उत्पादन घेता येते. एक हजार वर्ग मीटर मध्ये जरबेराची शेती करण्यासाठी ३ लाख ४१ हजारपर्यंत खर्च येतो.
परत उत्पन्नाचा विचार केला तर जवळ-जवळ ९ लाख ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. दुसऱ्या वर्षी खर्च कमी येतो. म्हणजे जवळ-जवळ १ लाख ३९ हजार रुपये खर्च येतो. परंतु उत्पन्न ९ लाख ५० हजारपर्यंत येते.
Share your comments