मित्रांनो भारतातील शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. आपल्याकडे जून-जुलै महिना सुरू झाला म्हणजे पावसाळा सुरू होतो. पावसाळा सुरू झाला की शेतकरी बांधव खरीप हंगामातील पेरणी कडे वळतो. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधवांनी पाऊस पडल्यानंतर म्हणजेच जून-जुलै महिन्यात कोणत्या पिकांची शेती करावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो शेती व्यवसायात यशस्वी होण्यासाठी हंगामानुसार तसेच पावसाच्या पाण्यावर आधारित पिकांची निवड करून शेती करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. यामुळे आज आपण जून जुलै महिन्यात शेतकरी बांधवांनी कोणत्या पिकांची लागवड कराव याविषयी जाणून घेणार आहोत.
महत्वाच्या बातम्या:
काळजी घ्या : रोटावेटर पात्याच्या फटक्याने युवक तरुणाचा मृत्यू
Successful Farmer : पाच दोस्तांनी सुरु केली औषधी वनस्पतीची शेती; आज लाखोंची कमाई
चांगला नफा मिळविण्यासाठी करा हे काम
खरं पाहिल्यास, जून-जुलै महिन्यात भारतात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात वेलवर्गीय भाजीपाला पिकांची शेती करत असतात. यामध्ये भोपळा, लुफा, कारले इ. पिकांचा समावेश असतो.
शेतकरी मित्रांनो जून-जुलै महिन्यात तुम्हाला तुमच्या शेतीतून अधिक नफा मिळवायचा असेल तर तुम्ही भात, मका, सोयाबीन आणि भुईमूग या खरीप हंगामातील पिकांची लागवड करू शकता. आपल्या राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी त्यांच्या शेतात मक्याची पेरणी सुरू करतात. त्याचबरोबर शेतकरी त्यांच्या शेतात धानाच्या सुवासिक वाणांची रोपवाटिकाही उभारू शकतात.
जून-जुलैमध्ये भाजीपाला वर्गीय पिकांच्या सुधारित जातीची लागवड करा
जून-जुलैमध्ये शेतात भाजीपाला लागवड केल्यास या पिकातून अधिक नफा कमवला जाऊ शकतो. मात्र यासाठी सुधारित वाणांची लागवड करणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना पिकांच्या सुधारित वाणाची लागवड करण्याचा सल्ला देतात. सुधारित जातीची लागवड केल्यास कमी वेळेत जास्त नफा मिळतं असतो. भाजीपाला लागवड शेतकरी बांधवांसाठी अत्यंत किफायतशीर आहे. कारण त्यांची मागणी बाजारात बारामाही बघायला मिळते.
भाज्यांचे सुधारित जाती
भोपळाच्या सुधारित जाती: पुसा नवीन, पुसा संदेश, पुसा समाधान, पुसा समृद्धी, पीएसपीएल, पुसा हायब्रीड-3 या भोपळ्याचा काही सुधारित जाती आहेत. याची लागवड करून शेतकरी बांधव चांगला नफा कमवू शकतात.
कारल्याच्या सुधारित जाती: शेतकरी बांधव त्यांच्या शेतात पुसा 2, पुसा स्पेशल, पुसा हायब्रीड-1आणि पुसा हायब्रीड-2 या कारल्याच्या जातीची लागवड करून चांगला बक्कळ पैसा कमवू शकतात.
तोराई सुधारित वाण : पुसा सुप्रिया, पुसा स्नेहा, पुसा चिकनी, पुसा नसदार, सातपुतिया, पुसा नूतन आणि को-१ या जाती लागवडीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. शेतकरी आपल्या शेतात याची लागवड करून सहज मोठा नफा कमवू शकतात.
Share your comments