आजकाल कमी वेळात शेतीमधून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच नफा मिळवण्यासाठी शेतकरी वर्ग शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. योग्य व्यवस्थापन आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे शेतकरी अशक्य गोष्ट ही शक्य करू शकतो. आजकाल शेतकरी वर्ग आपल्या शेतामध्ये भाजीपाल्याचे उत्पन्न जास्त घेत आहे यामुळे ज्वारी बाजरी गहू या पिकांचे प्रमाण कमी आले आहे.परंतु भाजीपाला शेतीमधून कमी वेळात बक्कळ पैसे मिळत असल्याने शेतकरी वर्ग भाजीपाला शेतीकडे वळत आहे. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये हिरव्या पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात मागणी असते परंतु उन्हाळ्यात भाज्यांचे दर सुद्धा खूप कडाक्याचे असतात. म्हणून फेब्रुवारीच्या च्या किंवा मार्च च्या काळात केल्यावर शेतकरी वर्गाला मोठा फायदा होतो.
मार्च महिन्यात या पिकांची पेरणी करावी:-
मार्च महिन्यामध्ये आपल्या शेतात काकडी, भोपळा, दोडका, फ्लॉवर, भेंडी या भाज्यांची पेरणी करावी. या सोबतच मेथी आणि कोथिंबीर सुद्धा लावावी. या पिकांची पेरणी मार्चपर्यंत सुरू असते. या महिन्यात पेरणी केल्यामुळे उत्पन्न सुद्धा चांगले मिळते आणि नुकसान होण्याचा धोका अजिबात नसतो.उन्हाळ्याच्या वेळी मेथीच्या भाजीला तसेच कोथिंबीर ला मोठ्या प्रमाणात मागणी असते तसेच भाव सुद्धा प्रचंड असतो. उन्हाळ्यात कोथिंबीर चे उत्पन्न आपण फक्त 21 ते 30 दिवसादरम्यान घेऊन बक्कळ नफा मिळवू शकतो.
लागवडीसाठी काकडीच्या सुधारित जाती:-
उन्हाळ्यात काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी असते शिवाय भाव सुद्धा चांगले असतात म्हणून मार्च महिन्यात काकडीची लागवड करणे शेतकरी वर्गासाठी खूप फायदेशीर ठरते. आपल्या कडे काकडीचे अनेक वाण प्रचलित आहेत त्यामध्ये स्वर्ण आगटे, स्वर्ण पौर्णिमा, पुसा उदय, पूना काकडी, पंजाब सिलेक्शन, पुसा संयोग, पुसा बरखा, काकडी 90, कल्याणपूर हिरवी काकडी, कल्याणपूर या वाणांचा समावेश होतो. याचबरोबर काही परदेशी वाण सुद्धाउपलब्ध आहेत त्यामध्ये जपानी लवंग ग्रीन, सिलेक्शन, स्ट्रेट-8 आणि पॉइन्सेट यांचा समावेश होतो.
सुधारित भोपळ्याच्या जाती:-
मार्च महिन्याच्या काळात शेतामध्ये भोपळा लागवडी वेळेस कोयंबतूर-१, अर्का बहार, पुसा समर प्रोलिफिक राउंड, पंजाब गोल, पुसा समर प्रोलिफिक लॅग, नरेंद्र रश्मी, पुसा संदेश, पुसा हायब्रीड, ३ पुसा या वाणांचा वापर करून आपले उत्पन्न वाढवावे.दोडक्याच्या सुधारित जाती:- दोडक्याच्या वानामध्ये पुसा चिकनी, पुसा स्नेहा, पुसा सुप्रिया, काशी दिव्या, कल्याणपूर चिकनी, फुले प्राजक्ता यांचा समावेश होतो.
भेंडीचे सुधारित वाण:-
मार्च महिन्यात भेंडीची लागण केल्यावर उन्हाळ्यामुळे भेंडीला चांगला भाव मिळतो त्यामुळे बक्कळ उत्पन मिळवण्यासाठी आपल्या शेतामध्ये भेंड्याच्या या वाणांची लागवड करणे गरजेचे आहे. त्यामध्ये क्रांती, पुसा सावनी, पंजाब पद्मिनी, पूजा ए-४, अर्का भाया, अर्का अनामिका, पंजाब-७, पंजाब-१३ यांचा समावेश आहे.याशिवाय उन्हाळा ऋतूमध्ये भाजीपाल्याला पाण्याचे योग्य व्यवस्थापन तसेच तणापासून पिकाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. योग्य व्यवस्थापन करून तुम्ही बक्कळ पैसे आणि मुबलक उत्पन मिळवू शकता.
Share your comments