नोव्हेंबर महिना म्हणलो की थंडीला सुरुवात आणि शेतकऱ्यांची इकडे रब्बी हंगामासाठी लगबग. नोव्हेंबर महिना हा गव्हाच्या लागवडीसाठी योग्य ठरला जातो. या महिन्यात गव्हाच्या व्यक्तिरिक्त अजून पिके घेतली जातात.आज आपण नोव्हेंबर महिन्यात कोणत्या कोणत्या पिकाची लागवड करता येते ते पाहणार आहोत.
गहु:-
नोव्हेंबर महिन्यात गव्हाची लागवड करण्यास भारतातील शेतकरी पसंदी देतात. भारतामध्ये गहू हे एक अस पीक आहे ज्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. भारताचे एक महत्वपूर्ण स्थान गव्हाच्या लागवडी बाबतीत मानले जाते आणि त्यात महाराष्ट्र म्हणजे एक लक्षणीय ठिकाण.शेतकरी वर्ग जर गव्हाची लागवड करण्याचा विचार करत असतील तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वावराची पूर्वमशागत करावी म्हणजे २५ तारखेच्या आत शेतकरी पेरणी करून घेतील.जर तुम्ही सांगितल्या प्रमाणे पेरणी करून घेतली तर चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन भेटेल. गहू पेरणी करण्याआधी मातीचे परीक्षण करून जमिनीत कोणत्या घटकांची कमतरता आहे त्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक वर्गाकडून घ्यावा.
हरभरा:-
भारतामध्ये हरभरा ची लागवड थोड्या प्रमाणात का होईना पण पाहायला भेटते जे की नोव्हेंबर च्या ऐंडींग पर्यंत आपटून घेण्याचा सल्ला दिला जातो. हरभरा च्या सुधारित जातीची लागवड करावी जसे की आपण पुसा 256, पंत जी 114, KWR 108 आणि KWR 850 या जातीचे बियाणे घेऊ शकता.हरभरा मधून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर मातीचे परीक्षण करून घ्यावे. जर कोणत्या घटकांची कमतरता असेल तर वैज्ञानिक वर्गाचा सल्ला घ्यावा. सव्वा एकर साठी ४० - ५० किलो हरभरा चे बियाणे लागतात.
वाटाणे आणि मसूर:-
वाटाणे आणि मसूर ची लागवड ऑक्टोबर महिन्यात केली जाते मात्र अजूनही झाली नाही. या महिन्यात सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. १५ नोव्हेंबर पर्यंत वाटाणे आणि मसूर ची लागवड करून घ्यावी.मसुरची लागवड करायची असेल तर सव्वा एकर साठी २० किलो बियाणे तर वाटाणा च्या सव्वा एकर साठी ५० किलो बियाणे आवश्यक असतात. बीजप्रक्रिया करून घ्यावी नाहीतर उत्पादन घटेल. मागील महिन्यात ज्यांनी लागवड केली आहे त्यांच्या पिकात जर कोरडापणा दिसत असेल तर पाणी देणे आवश्यक आहे.
Share your comments