सध्या महाराष्ट्र समवेतच संपूर्ण देशात रब्बी पिकांची काढणी सुरु आहे अनेक ठिकाणी रब्बी हंगाम (Rabi Season) आता अंतिम टप्प्यात आला आहे तर काही ठिकाणी काढणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामाची काढणी (Rabi Crop Harvesting) झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप हंगामाकडे (Kharif Season) वळतात मात्र असे असले तरी ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध असतो असे शेतकरी (Farmers) या दोन ते तीन महिन्यांच्या दरम्यान रिकाम्या असलेल्या शेतात अल्प कालावधीत काढणीसाठी येणाऱ्या उन्हाळी पिकांची (Summer Crop) शेतकरी बांधव लागवड करून भरपूर नफा कमवू शकतात.
एप्रिल महिन्यात उन्हाळी पिके लागवड करून शेतकरी बांधव चांगला नफा कमवू शकतात. अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या उन्हाळी पिकांची लागवड करून शेतकरी कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगला नफा मिळवू शकतात. आज आपण एप्रिलच्या शेवटच्या पंधरवाड्यात लागवड केल्या जाणाऱ्या पिकांविषयी माहिती जाणुन घेणार आहोत.
एप्रिलच्या शेवटच्या पंधरवाड्यात या पिकांची लागवड करा:- मूग : मुगाची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे मुगाचे पिक तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. अवघ्या 60 ते 70 दिवसांत तयार होणाऱ्या या पिकातून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.
भुईमूग : मूगप्रमाणेच शेतकरी बांधव एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भुईमुगाची देखील पेरणी करू शकतात. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात या पिकाची कायम मागणी असते आणि याला चांगली किंमत देखील मिळते.
मका : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पंजाब मक्याच्या शेतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, एप्रिल महिन्यात 'साठी' या जातीच्या मक्याची लागवड केल्यास चांगला नफा मिळू शकतो. निश्चितच या पिकांची लागवड करून शेतकरी बांधव चांगला मोठा नफा अर्जित करू शकतात.
बेबी कॉर्न: या महिन्यात बेबी कॉर्नची लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बेबी कॉर्न मोठ्या आवडीने खाल्ले जाते, यामुळे बाजारात याला मोठी मागणी असते. अशा परीस्थितीत बाजारात याची किंमत देखील चांगली राहते. म्हणुन या पिकाची लागवड करून शेतकरी बांधव अवघ्या 60 दिवसांत चांगला नफा कमवू शकतात.
शेतकऱ्यांनी त्यांच्या परिसरातील हवामानानुसार आणि वेळेनुसार योग्य पिकाची निवड करून चांगली कमाई करू शकतात. या सर्व पिकांची लागवड शेतकऱ्यानी योग्य पद्धतीने केल्यास आगामी 60-70 दिवसांत लाखोंचा नफा कमवू शकतात.
Share your comments